सनी लवकरच मराठी चित्रपटात आयटम सॉँग करणार!

0

शाहरूख खानच्या ‘रईस’ या चित्रपटात ‘लैला मैं लैला’ या गाण्यावर ठुमके लावणारी सनी आता मराठीतही दिसणार आहे.

याचा खुलासा चित्रपट निर्माता अवधूत गुप्ते याने एका मुलाखतीत केला आहे.

एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अवधूतने म्हटले की, मी एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करीत आहे. ज्याकरिता मी चित्रपटातील एका आयटम सॉँगसाठी अभिनेत्री सनी लिओनी हिला अप्रोच झालो आहे.

प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी अन् प्रोमोशनमध्ये याचा फायदा होण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर अवधूतने असेही सांगितले की, सनीच्या इच्छेप्रमाणे गाण्याची निर्मिती करणे खूपच अवघड आहे.

सनीचे हे आयटम सॉँग गणेश आचार्य कॉरिओग्राफ करणार असून, चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल देवरूखकर करणार आहे.

हा चित्रपट तरुणांच्या भावविश्वावर आधारित असणार आहे.

LEAVE A REPLY

*