सनदी अधिकाऱ्यांच्या मुलांकडे सापडल्या दहा रुपयांच्या नकली नोटा

0

इगतपुरी (झाकीर शेख) : उच्चपदस्थ सनदी अधिकार्‍यांच्या मुलांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास इगतपुरी येथील मिस्टिक व्हॅलीत धिंगाणा घालण्याचा प्रकार उघडकीस आणल्यानंतर नवीनच माहिती समोर येत आहे.

या मुलांनी बारबालांवर उधळलेल्या १० रुपयांच्या एकूण ३२२० रुपये नकली नोटा असल्याची माहिती प्रतिनिधीकडून प्राप्त होत आहे.

घटना स्थळावरून पोलिसांनी ५७ हजार रुपये रोख जप्त केले होते. यामध्ये १० रुपयांच्या नकली ३२३० रुपयांच्या नोटा, मारुती इर्टिगा क्रमांक एम. एच. ०२ सी. आर. ४३६६, लॅपटॉप, २ स्पीकर, १ एम्प्लिफायर  ३ ब्लॅक लेबलच्या ७५० मी लीच्या सीलबंद दारू बाटल्या, १ अप्सुलेट वोडका बाटली असा ऐवज जप्त करण्यात आला होता.

मुलांकडे नकली नोटा आल्या तरी कुठून याची चौकशी केली जात आहे. दरम्यान, काल सोमवारी या मुलांची चौकशी केली त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे.

LEAVE A REPLY

*