सदाभाऊ खोतांकडून शेतकऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रण

0

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी अहमदनगरच्या पुणतांबा येथे जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली.

येत्या 1 जुनपासून शेतकऱ्यांकडून संप पुकारण्यात येणार आहे.

या सगळ्याच्या पूर्वतयारीसाठी पुणतांबा येथे 25 मेपासून धरणे आंदोलनला सुरूवात झाली आहे.

यावेळी सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना कोणतेही थेट आश्वासन द्यायचे टाळले. चर्चेची दारे बंद करू नका, मुंबईला या, मागण्यांवर बोलू, मग अंतिम निर्णय घ्या, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*