सत्येंद्र जैन यांनी केजरीवालांना 2 कोटी रूपये दिले; आप नेते कपिल मिश्रांचा गंभीर आरोप

0

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंत्रीमंडळातून बडतर्फ केल्यानंतर कपिल मिश्रा यांनी केजरीवाल यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.

दिल्लीतील मंत्री सत्येंद्र जैन यांनी अरविंद केजरीवाल यांना दोन कोटी रुपये देताना बघितले होते असा आरोप त्यांनी केला आहे.

50 कोटींचा गैरव्यवहार उघडकीस येऊ नये यासाठी ही रक्कम देण्यात आल्याचा आरोप जैन यांनी केला. इतकंच नाही तर हे पैसे देताना मी स्वतः पाहिलं असा आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर आरोप केला. हे पैसे कुठून आले आणि कशासाठी देण्यात आले याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*