सत्यपाल महाराज यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मराठी शाहीर परिषदेतर्फे निदर्शने

0
धुळे / सप्त खंजेरीवादक व लोककलावंत सत्यपाल महाराज यांच्यावर गेल्या महिन्यात मुंबई येथे माथेफिरुंनी चाकूने भ्याड हल्ला केला.
त्याचा जिल्हा मराठी शाहीर परिषदेतर्फे जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून समाजातील विचारवंत, कलावंत, पत्रकार यांच्यावर भ्याड हल्ले होत आहेत.

हे हल्ले वैचारीक पातळीवर नसून बदला घेण्याच्या भावनेने हल्लेखोर हल्ला करीत असतात. कलावंतांना गावोगावी जावून प्रबोधन करणे, समाजाच्या विचारांची दिशा बदलणे व त्यांना योग्य मार्गावर आणण्याचे काम कलावंत, शाहीर करीत असतात.

त्यामुळे कलावंतांवर होणार्‍या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी धरणे आंदोलन करीत असल्याचे पत्रकात म्हटले आहे. हल्लेखोरांवर योग्य कारवाई होवून बंदोबस्त व्हावा व कलावंतांना कार्यक्रमास्थळी संरक्षण देवून न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

गंभीर बारेसे, आप्पा खताळ, श्रावण वाणी, माणिकराव शिंदे, शेषराव गोपाळ, अनिल जगताप, शंकराव पवार, भटू गिरमकर आदी आंदोलनात सहभागी झाले आहेत.

LEAVE A REPLY

*