सट्टा जुगार चालविणार्‍या चौघांना अटक

0

जळगाव | प्रतिनिधी :  शहरात सट्टाजुगार खेळवितांना चार जणांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून सुमारे १९ हजाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसांत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील गुजरालाल पेट्रोलपंपाजवळील वाईन शॉप जवळ सट्टा जुगार खेळवित असल्याची माहिती डीवायएसपी सचिन सांगळे यांना मिळाली.

त्यांनी पथकातील सपोनि अशोक वानखेडे, सफौ.तुकाराम गंधाले, अनिल पाटील, विजय काळे, रविंद्र मोतीराय, ज्ञानेश्‍वर पाटील यांना बोलावून कारवाईच्या सुचना दिल्या. या पथकाने घटनास्थळी जावून सापळा रचला. यावेळी सट्टा जुगाराच्या साहित्यासह सहा जण मिळून आले. पोलीसांना पाहुन सहापैकी दोघांनी पळ काढला.

तर पोलीसांनी गोविंदा लक्ष्मण अंबुरे (वय२७, रा.शिवाजीनगर हुडको), शेख अब्दुल शेख रफिक (वय ६०, रा.मिलाल मशिद जवळ), रविंद्र भास्कर पाटील (वय२७ रा.पाळधी ता.धरणगाव), शरद नारायण नागरे (वय ५५ रा. जळगाव) यांना ताब्यात घेतले.

चौघांची चौकशी केली असता शिवाजीनगरमधील शंभु दिलीप भोसले व सिंधी कॉलनीतील श्याम कुकरिया यांच्या सांगण्यावरुन सट्टा जुगार खेळवित असल्याची माहिती पोलीसांना चौघांनी दिली. भोसले व कुकरिया यांच्यासह चौघांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*