Type to search

क्रीडा

सचिनचा विक्रम धोक्यात

Share

लंडन । इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या सामन्यानंतर दोनच दिवसात विश्वचषकातील आणखी एक विक्रम झाला. ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश सामन्यादरम्यान दोन्ही इनिंग मिळून सर्वाधिक धावांचा विक्रम झाला. यात एकूण 714 धावा झाल्या. यातले 381 धावा ऑस्ट्रेलियाने आणि 333 धावा बांगलादेशने केले. आता या विश्वचषकात सचिन तेंडुलकरचा विक्रमही धोक्यात आला आहे.

2003 विश्वचचषकात सचिन तेंडुलकरने 673 धावा केल्या होत्या. सचिन तेंडुलकरचा एका विश्वचषकात सर्वाधिक धावांचा हा विक्रम अजूनही कायम आहे. पण ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अ‍ॅरॉन फिंच या दोघांकडून सचिनच्या या विक्रमाला धोका आहे. इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गनने एकदिवसीय क्रिकेटच्या एका इनिंगमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मॉर्गनने 17 षटकार ठोकले. तर याच सामन्यात राशिद खान विश्वचषक इतिहासातला सगळ्यात महागडा गोलंदाज ठरला. राशिद खानने 9 षटकात 110 धावा दिल्या.डेव्हिड वॉर्नरने या विश्वचषकात 7 सामन्यांच्या 7 इनिंगमध्ये 500 धावा केल्या. तर अ‍ॅरॉन फिंचने 7 सामन्यांमध्ये 496 धावा केल्या. सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडायला वॉर्नरला आणखी 174 तर फिंचला 178 धावांची गरज आहे.

या फेरीतल्या उरलेल्या 2 सामने आणि सेमी फायनल अशा कमीत कमी 3 सामने खेळतील.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!