सगळे वाद ठेवा बेडरूमच्या आत !

0

रीना शाळेत फार उदास असायची. छोट्या छोट्या कारणावरून रडायची. तिच्या लाडक्या मीरा टीचरच्या ही गोष्ट लक्षात आली. तिने अगदी खोदून खोदून विचारल्यावर रीनाने सांगितले की घरी रोज आई- बाबांचे भांडण होते.

त्याची तिला हल्ली भीती वाटत आहे. मीरा टिचरने रिनाच्या आई वडिलांना बोलावले. तेव्हा त्यांचे उत्तर ऐकून चकितच झाल्या . रिनाच्या पालकांचे असे म्हणणे होते की , आपल्या मुलांसमोर पूर्णतः खरे असणे महत्त्वाचे . ते मुलांसमोर वाद विवाद करतात.

पण त्यांना कमीत कमी ही खात्री असते की त्यांच्या मुलांना प्रत्यक्ष परिस्थितीची जाणीव आहे कारण ते ह्या वादाचे साक्षी असतात आणि पालकांना त्यांच्या मुलांसमोर ” सगळं चांगल आहे ” असं दाखवाव लागत नाही.

नंतर मीरा टीचरने समजावले की मुलांपासून वाद शक्यतो दूर ठेऊन त्यांच्या समोर नॉर्मल वागणे. या सगळ्याचा रिनाच्या वर्तमानावर आणि भविष्यावर कसा परिणाम होऊ शकतो हे समजावले.

ह्या मागचा हेतू खूप वैध आणि शुद्ध आहे, कारण वादाचा वाईट प्रभाव मुलांवर पडू शकतो. परिवारात होत असणाऱ्या  वादविवादांचा त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होतो.

त्यांच्या मनात अज्ञात भीती निर्माण होते . हे दुसरं मत अधिक योग्य कारण घरातील सगळ्या परिस्थितीची  करून देण्यासाठी तुम्ही मुलांना नीट आणि त्यांच्या भाषेत समजावू शकतात.पण  दोघांतील वाद हे बेडरूमच्या आत झाले पाहिजे.

LEAVE A REPLY

*