सकारात्मक विचारातून जिवनाला दिशा

0
जळगाव । दि.14। प्रतिनिधी- ज्या माणसाची स्व:प्रतिमा वाईट असते त्याला सर्व जग वाईट दिसते. त्यामुळे त्यापासून दुर राहिलेलेच बरे असते. सकारात्मक विचारांतून जीवनाला दिशा मिळते आणि त्यात जीवनाचे यश दडलेले असते.
जिथं जावं तिथं रमून जावं, कामाशी एकरूप व्हावं, जे काही करायचे आहे ते स्वयंस्फूर्तीने करावे अशा शैलीची कुठेही नक्कीच प्रशंसा होते, अशा पध्दतीचे मार्गदर्शन अनिता गिलबिले, गोपी गिलबिले यांनी केले.
पोलीस मुख्यालयातील मंगलम् सभागृहात पोलीस अधिकारी कर्मचारी व कुटूंबियांसाठी तणावमुक्त जगण्याचा मूलमंत्र कार्यक्रम ‘घरकुल’ याप्रसंगी गिलबीले दाम्पत्य मार्गदर्शन करीत होते.

व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अप्पर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, डीवायएसपी (गृह) रशीद तडवी उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी केले.

जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी अशा कार्यक्रमाची गरज असल्याचे सांगत प्रत्येकाने विचार बदले गरजेचे आहे. यातुनच नशीब बदलते. अनिता, गोपी गिलबीले यांनी अतिशय मार्मिकपणे जीवनशैली तणावमुक्त कशी जगता येईल, याचे स्पष्टीकरण सविस्तरपणे देऊन सुखी जीवनाचा मूलमंत्र सांगितले.

पालकांनी पाल्यांकडे ज्या नजरेने बघितले तसेच त्यांचे व्यक्तिमत्व घडत असते. मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी प्रामुख्याने आईची असते.

संस्कारातून मुलगा घडविता येतो, हे तर जिजाऊंचे उदारहरण आपल्या पुढे असल्याचे गिलबिले म्हणाले. मुलाला नेहमी दोष देणे हे योग्य नाही.

परंतु त्याला हुशार म्हटल्यास त्याचे परिणाम चांगलेच दिसण्यास मदत होते. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुलांचा अभ्यास आणि संस्कार हे मुलांचे भवितव्य घडवितात, नुसती मार्कांची गुणवत्ता चालणार नाही, तर संस्कारांचीदेखील त्यास जोड हवी, यासाठी आई-वडील यांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.

समाजात शिक्षण वाढले, ही प्रगती म्हणावी लागेल. परंतु त्याबरोबरच पती-पत्नीमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढत असल्याचे क्लेशदायी चित्र समोर आले आहे.

कौटुंबिक वादाची अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. जेवढे शिक्षण अधिक तेवढेच घटस्फोट देखील जास्त असे दिसते आहे, असे सांगून गिलबीले म्हणाले, की, स्त्रीपुरूषाच्या आयुष्यात येणारी बरी वाईट स्थित्यंतरे सोसून त्या उभयतांना अधिक सक्षम आणि सशक्त बनविण्याचा अवसर देणारी शाश्वत व्यवस्था म्हणजे विवाह.

अखंड आयुष्यभराची सोबत हा विवाहसंस्काराचा मूळ उद्देश आहे. परंतु आज त्याला छेद जातोय. आणि त्याला कारण मतभेद आणि मनभेद! यासाठी सहनशील वृत्तीची जोपासना करणे आवश्यक आहे.

रमणी म्हणजे प्रत्येक पायाचा सार हा पायात दिला आहे. कदाचित आपणास नोकरी आवडीची मिळाली नसेल; परंतु मिळालेली नोकरी आवडीने करायला हवी.

असा सल्ला गोपी गिलबीले यांनी व्यक्त केला. काहींना नेहमी दोष शोधण्याची व्याधी असते. असे नकारात्मक लोक हट्टी असतात. अशा वेळी न बोलणे चांगले असते.

 

LEAVE A REPLY

*