सई ताम्हणकर दिसणार दाक्षिणात्य चित्रपटात!

0

मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये मिळालेल्या यशानंतर सई ताम्हणकर आता दाक्षिणात्य इंडस्ट्रीकडे वळली आहे.

लवकरच ती सोलो या दाक्षिणात्य चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट मल्याळम आणि तामिळ या दोन्ही भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

सोलो हा रोमँटिक थ्रिलर चित्रपट असून या चित्रपटाचे दिग्दर्शन बिजोय नामदार यांनी केले आहे तर डलकर सलमानची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे.

त्याचसोबत डिनो मोरिया, नेहा शर्मा हे बॉलिवूडमधील कलाकार देखील या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाचे काही चित्रीकरण कोचिन तर काही चित्रीकरण मुंबईत आणि लोणावळ्यात झाले आहे.

या चित्रपटात सईची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे.

सोलो या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट करून सईनेच तिच्या फॅन्सना ही बातमी दिली आहे.

सोलो या चित्रपटात मी महत्त्वाची भूमिका साकारत असून या चित्रपटाचा टीझर लवकरच तुमच्या भेटीस येणार असल्याचे तिने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*