संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून; सर्वपक्षीयांच्या आज दिल्लीत बैठका

0

संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे.

एकदिवस आधीच सर्वपक्षीयांच्या आज दिल्लीत बैठका होणार आहेत. या बैठकीत एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी नाव आज निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एनडीएच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काँग्रेससह विरोधी पक्षांनी उपराष्ट्रपतीपदासाठी अगोदरच नाव जाहीर केलं आहे. विरोधी पक्षांनी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि महात्मा गांधी यांचे नातू गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांकडून माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर आता उपराष्ट्रपतीपदासाठी गोपालकृष्ण गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

LEAVE A REPLY

*