संशयित बॅगा सापडल्याने पठाणकोटमध्ये हाय अलर्ट

0

पठाणकोटमधील ममून आर्मी कॅन्टॉनमेंटजवळ दोन संशयास्पद बॅगा सापडल्या आहेत.

यासोबतच पोलिसांना तपासादरम्यान दोन मोबाईल टॉवर बॅटरीदेखील आढळून आल्या आहेत. यामुळे येथे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

काल (बुधवारी) पंजाबमधील पठाणकोट आणि गुरुदासपूरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. तीन संशयास्पद व्यक्तींनी एका गावाजवळ एसयूव्ही सोडून दिल्यावर पोलिसांनी त्या व्यक्तींचा शोध सुरु केला. मात्र अद्यापपर्यंत एकालाही अटक करण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

*