Type to search

आवर्जून वाचाच विशेष लेख

संवाद साधण्यासाठी आता इमोजी च्या भाषेचा वापर

Share

हसवणारे, रडणारे, चिडवणारे, लहान लहान इमोजी किंवा स्माईली आज आपल्या भाषेचा एक भाग बनले आहेत. गुड मॉर्निंग सोबत सूर्य पाठवला जातो, तर गुड नाईट सोबत चंद्र. अभिनंदनासाठी फुलांचा गुच्छ पाठविला जातो, तर कधी एखाद्या जोकर जोरजोरात हसणारा स्मायली पाठवला जातो. बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात खूप व्यस्त आहेत. कोणाला कोणाच्या आयुष्यात दखल घेण्याची किंवा कोणाची विचारपूस करण्यासाठी वेळ नाही,

तिथे भेटणे तर दूरच. पण एक बरं की फोन मुळे माणसे किमान एकमेकांच्या संपर्कात तरी राहतात. आता स्मार्ट फोन आले आणि त्याचा अतिरेक इतका झाला की स्मार्टफोन हाच प्रत्येकाचा सोबती झाला आहे.स्मार्टफोन असेल तर एकाला दुसर्‍या माणसाच्या सोबतीची गरजही भासत नाही. त्यामुळे दूरची माणसं जवळ आली आहे.प्रत्येक जण एकमेकांच्या संपर्कात आहे, पण जवळ नाही. शिवाय व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यामुळे मित्रांची यादी वाढतच चालली आहे हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. सोशल मीडियावर इतके मित्र बनतात की बर्‍याच मित्रांना मैत्रिणींना आपण ओळखतही नसतो मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी आपले रोजचे बोलणे सुरूच असते कधी शब्दांनी तर कधी इमोजी ची भाषा वापरून.

पण जीवनातला खरा संवाद मात्र कोणाशी होत नाही. आता एकमेकांशी संवाद साधणे तसे जवळ-जवळ होतच नाही. काही बोलायचे असेल निरोप द्यायचा असेल तर तेसुद्धा व्हाट्सअप वर टाईप करून बोलले जाते. आणि आता तर काय भाषासुद्धा संपुष्टात येऊ लागली आहे. बोलण्यासाठी आपल्या भावना पोहोचवण्यासाठी इमोजीचा वापर केला जात आहे. प्रत्येक भावना दर्शवणारी ईमोजी आहेत. त्यामुळे भाषेचा वापर न करता फक्त ईमोजी पाठवले तरी त्या व्यक्तीला नेमकं काय म्हणायचं, त्याच्या मनात काय चालला आहे, हे समोरच्या व्यक्तीला पटकन कळतं. अलीकडली पिढी या इमोजी च्या भाषेत जास्त वापर करीत असते.

आणि हीच भाषा त्यांना जास्त कळते सुद्धा हे फार महत्त्वाचे आहे. दिसणार्या गोष्टी या पटकन समजतात आणि मनाला भावतात सुद्धा. काहींचे म्हणणे असे आहे की स्माईली वापरण्याने संभाषण हे पटकन होते, तसेच सोपेही होते. मात्र काळानुसार संवाद साधण्याची साधने बदलली. आता तर शांतपणे व्हाट्स अ‍ॅप वर लिहून संवाद साधला जातो. त्या स्मायली चा वापर केलाच जातो. अलीकडे स्मायली चा वापर औपचारिक बोलण्यात सुद्धा केला जातो. फक्त हाय म्हणताना एक स्मायली पाठवली जाते.

आपल्याला जे म्हणायचं ते या स्मायली पोचवतात, असा विचार त्यामागे पाठवणाराचा असतो. नेट, इंटरनेट यामुळे जग जवळ आलं आहे, असं म्हटलं जातं.मनाची भाषा मात्र हरवत चालली आहे. या ईमोजी च्या जगात ते प्रेमाने मायेने विचारपूस करणारे शब्द मात्र हरवत चालले आहे. पण अमर्याद वापरामुळे इमोजी चा वापर सुसाट होत आहे हे मान्य करायलाच हवे.
– ललितकुमार नीळकंठ फिरके, मो. 9421523840

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!