Type to search

ब्लॉग

संवादाची ’डिजिटस्’ भाषा…

Share
स्क्रीनवरून मजकूर वाचताना हाताच्या बोटांनी पान उलटण्यासारखी कृती केली की स्क्रीनवर पुढचे पान येते. सध्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवरचे चित्र लहान-मोठे करण्यासाठी किंवा पुढील चित्रावर जाण्यासाठी आपण बोटांच्या हालचाली वापरतोच. परंतु त्यासाठी स्क्रीनला स्पर्श करणे गरजेचे असते. नवे तंत्रज्ञान डिजिटस्मुळे हे काम काही अंतरावरून करता येते. तसेच गरजेनुसार स्क्रीनवर वापरकर्त्याच्या हाताची हालचाल दाखवण्याचीही व्यवस्था करता येते.

आपल्या दैनंदिन जीवनातील व्यवहारांच्या प्रत्येक पायरीवर इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर वाढतो आहे. संगणक, सेलफोन, आयपॉड, गेमिंग कॉन्सल, कार-ऑडिओ सिस्टिम्स, स्वयंपाकघरातली विविध यंत्रे…यातील प्रत्येक साधन अधिकाधिक कार्यक्षम होत चालले आहे आणि तितकेच गुंतागुंतीचेही. म्हणजे कित्येकदा त्याच्या सर्व बटनांचा आणि सुविधांचा अर्थ समजून त्यांचा सफाईने वापर करण्याकरिता एखाद्या व्यक्तीला महिनादेखील सहज लागू शकतो! अशावेळी त्यांच्याशी संवाद साधण्याचे विविध मार्ग ऊर्फ इंटरफेस उत्पादकांतर्फे पुरवले जातात. पूर्वी (म्हणजे फक्त आठ-दहा वर्षांपूर्वी!) हा संवाद फक्त बटने दाबूनच शक्य होत असे. आता दूरनियंत्रकामार्फत, आवाजाने (व्हॉईस कमांड), शारीरिक हालचालींद्वारे, स्पर्शातून (टचस्क्रीन) हे काम करता येते. अशांपैकीच सर्वात नवीनतम आणि सोयीस्कर प्रणालीची आपण आता माहिती घेऊ.

‘डिजिटस्’ हे या नव्या क्रांतिकारी प्रणालीचे नाव. या नव्या डिजिटस् प्रणालीद्वारे हाताच्या हालचाली त्रिमितीमध्ये (थ्री-डी) ओळखून त्यांचे रूपांतर सॉफ्टवेअरला देण्याच्या आज्ञावलीमध्ये (कमांडस्) केले जाते. उदा. स्क्रीनवरून मजकूर वाचताना हाताच्या बोटांनी पान उलटण्यासारखी कृती केली की स्क्रीनवर पुढचे पान येते. सध्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवरचे चित्र लहान-मोठे करण्यासाठी किंवा पुढील चित्रावर जाण्यासाठी आपण बोटांच्या हालचाली वापरतोच, परंतु त्यासाठी स्क्रीनला स्पर्श करणे गरजेचे असते. डिजिटस्मुळे हे काम काही अंतरावरून करता येते. तसेच गरजेनुसार स्क्रीनवर वापरकर्त्याच्या हाताची हालचाल दाखवण्याचीही व्यवस्था करता येते.

आणखी एक-दूरनियंत्रण ऊर्फ ‘रिमोट कंट्रोल’ यशस्वी होण्यासाठी आपल्या हातातील रिमोट आणि संबंधित इलेक्ट्रॉनिक साधनामध्ये कोणताही अडथळा आलेला चालत नाही हे आपण अनुभवले असेल. म्हणजेच रिमोटला संबंधित उपकरण ‘दिसणे’ गरजेचे असते. परंतु डिजिटस्ने ही भानगड ठेवलेली नाही. ‘डायरेक्ट लाईन ऑफ साईट’ नसतानाही इतर कोणत्याही बाह्य साधनासामुग्रीच्या वापराखेरीज ही संवाद प्रक्रिया चालू ठेवता येते. त्यामुळे डिजिटस् वापरणार्‍या व्यक्तीला विशिष्ट जागी बसून राहावे लागत नाही, ती मोकळेपणाने हालचाली करू शकते. या तंत्राचा मोठा फायदा व्हिडीओ गेम्स खेळणार्‍यांना होणार आहे हे नक्कीच! याशिवाय व्यवहारात वापरल्या जाणार्‍या इतर इलेक्ट्रॉनिक साधनांशी संवाद साधणेही यामुळे सुलभ होईल.

सध्या हे उपकरण मनगटी घड्याळापेक्षा नक्कीच मोठे, वजनदार आणि (त्यामुळेच) किंचित गैरसोयीचे आहे म्हणा. परंतु त्यामध्ये सुधारणा करून काही महिन्यांतच त्याचे वजन आणि आकार मनगटी घड्याळाइतकाच होईल. यामध्ये एक इन्फ्रारेड कॅमेरा, लेझर लाईन जनरेटर, डिफ्यूज इल्युमिनेटर आणि हालचाली मोजणारे इनर्शिअल मेझरमेट युनिट (खचण) असे घटक आहेत. येत्या काही वर्षांतच टॅब्ज, सेलफोन आणि काईनेक्टशी संवाद साधण्याचे प्रमुख माध्यम म्हणून डिजिटस्चा विकास करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे वापरकर्त्यांना (विशेषतः व्हिडीओ गेम्स खेळणार्‍यांना) त्या साधनात समाविष्ट असलेल्या सुविधांची जास्त चांगली अनुभूती मिळेल असा तिला विश्वास वाटतो.

डिजिटस्चा विकास प्रत्यक्षात आला तर त्याचा अनेक ठिकाणी वापर करता येईल. विशेषतः व्हिडीओ गेम कंट्रोलर्सचे तर स्वरूपच पूर्णपणे बदलेल! कारण हालचालींचा मागोवा घेणारी विविध साधने (मोशन ट्रॅकर्स) आजही मिळत असली तरी डिजिटस्ची अचूकता त्यापेक्षा खूपच जास्त आहे आणि त्याचे नियंत्रण करणे अधिक सोपे आहे. त्यामुळे वापरकर्त्याला फक्त गेम खेळणे नाही तर संगणक आणि इतरही इलेक्ट्रॉनिक वस्तूंशी संवाद साधणे खूपच सुलभ होणार आहे.
– डॉ दीपक शिकारपूर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!