संमतीशिवाय रंग उडविल्यास गुन्हा; रंगपंचमीसाठी पोलीसांचा फतवा

0

नाशिक । दि. 13 प्रतिनिधी – शहरात आज धुलीवंदन उत्सहात साजरे झाले तर चार दिवसांनी रंगपंचमी साजरी होणार आहे.

या दरम्यान महिलां तसेच मुलींच्या संमतीशिवाय त्यांना रंग लावण्याचा अथवा उडवण्याचा प्रकार घडल्यास विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी स्पष्ट केले.

शहरात होळीनंतर रंगपंचमी उत्सव मोठ़या प्रमाणात साजरा केला जातो. परप्रांतीय बांधव धुलीवंदन उत्साहात साजरी करतात. या काळात महिलांच्या अंगावर रंग उडवण्याचे प्रकार घडतात.

महिला अथवा मुलींची इच्छा नसताना रंग उडवण्याचा प्रकार घडल्यास संबंधित व्यक्तीविरोधात थेट विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे गोरे यांनी सांगितले

दरम्यान, धुलीवंदना नंतर आता रंगपंचमीसाठी विविध सार्वजनिक मंडळांमध्ये उत्साह आहे.

या मंडळांनी रहाडी, रेनडान्स, यासह विविध कार्यकमांचे आयोजन केले असून पोलिसांकडे त्या संबंधी नोंदही केली आहे. या नोंदीनुसार शहरात मोठ़या स्वरूपात रंगपंचमी साजरी होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रत्यक्षात हा आकडा यापेक्षा मोठा असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, होळीपासून शहरात विरांची पारंपरिक मिरवणुक सुरू झाल्या असून या रंगपंचमी पर्यंत चालतात तर अखेरच्या दिवशी गोदाघाटावर यात्रा भरते.

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अधिकारी, कर्मचार्‍यांचा अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. हा सोहळा पाहण्यासाठी नाशिककर मोठी गर्दी करतात. त्यामुळे हा बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात शस्त्र, जमावबंदी आदेश
नाशिक : जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शस्त्र व जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
अपर जिल्हा दंडाधिकारी रामदास खेडकर यांनी 15 मार्च पर्यत रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.
तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणुका काढण्यास संबंधित तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांची रीतसर परवानगी घेतलेल्या व्यक्तींना लागू असणार नाही.

LEAVE A REPLY

*