संपामुळे शहरातील बँकिंग ठप्प

0

कोट्यवधींची उलाढाल थांबली, संप यशस्वी झाल्याचा कर्मचार्‍यांचा दावा

अहमदनगर (प्रतिनिधी)– केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियनच्यावतीने मंगळवारी एक दिवसीय संपाची हाक दिली होती. त्यानूसार आज नगर शहरातील बँक कर्मचारी आणि अधिकारी संपावर होते. या संपामुळे शहरातील बँकिंग ठप्प होत कोट्यावधी रुपयांचे व्यवहार खोळंबले.
नगर शहर आणि परिसारात वेगवेगळ्या बँकांच्या 100 हून अधिक शाखा आहे. या शाखांमधील बहूतांशी कर्मचारी या संपात सहभागी झाले. शहरातील युको बँक समोर कर्मचार्‍यांची सभा होत या ठिकाणी सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करू नका, बँकांचे विलीनीकरण आणि एकत्रीकरण योजना बंद करा, कॉर्पोरेट अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) माफ करू नका, बँकांचे कर्ज बुडवण्याला फौजदारी गुन्हे म्हणून घोषित करा,आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
संपात कॉ. योगिराज खोंडे, कॉ. माणिक आडाणे, मोनिका आहेर, कॉ. सरोदे, कॉ. शिरिष टिळेकर, कॉ. कांतीलाल वर्मा, कॉ. उल्हास देसाई कॉ. उमाकांत कुलकर्णी, कॉ. महादेव भोसले, कॉ. प्रकाश साळवे, कॉ.शिवाजी पळसकर, कॉ. शशांक देवधर, कॉ. नंदकुमार जोशी, कॉ. गुजराथी, कॉ. भळगट आदी यांच्यासह शेकडो कर्मचारी सहभागी झाले.ल

LEAVE A REPLY

*