अकोलेत पिसाळलेल्या कुत्र्याचा पाच बालकांना चावा,दोन गंभीर जखमी

0
अकोले (प्रतिनिधी)-अकोले शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने चार ते पाच बालकांसह परप्रांतीय तरूणास रात्री नऊ वाजेच्या सुमारास चावा घेतला आहे .या मध्ये ईस्लाम पेठेतील दोन बालकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिकच्या रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
येथील इस्लाम पेठ मधील हुजैफ जहीर शेख (वय4) याच्या डोके, खांदा व बगलेत चावा घेतला तर हुजैफ फिरोज शेख (वय3) याच्या तोंडाला चावा घेतला आहे.दोन्ही बालकांना टाके घालण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने नाशिकच्या रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
महालक्ष्मी कॉलनीतील एक बालक गंभीर जखमी झाला आहे.
दरम्यान अकोले ग्रामीण रूग्णालयात श्वान दंश प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे.पिसाळलेल्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*