संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत

0

लोणी बुद्रुक गावातील कामाने समितीचे समाधान

 

लोणी (वार्ताहर)- राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील विविध अभियानात सहभागी होऊन लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने केलेल्या कामाच्या आधारे आतापर्यंत 1 कोटी 37 लाखांची बक्षिसे मिळवली आहेत. मोठ्या लोकसंख्येचे गाव असूनही ग्रामपंचायतीने केलेले काम आणि निर्माण केलेल्या सुविधा बघून नाशिक विभागीय समितीने समाधान व्यक्त केले.

 

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत नाशिक विभागासाठी समितीने लोणी बुद्रुक गावाची पाहणी केली. या समितीचे नेतृत्व विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले. गावातील दलित वस्ती, स्मशानभूमी, पाणीपुरवठा तलाव आणि योजना, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, वृक्ष लागवड याबरोबरच ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड समितीने बघितले.

 

ग्रामपंचायतीने गावाच्या प्रमुख ठिकाणी बसवलेले सी.सी.टी.व्ही. कॅमेरे, रेकॉर्ड नोंदींचे इ. पोर्टल, संपूर्ण संगणकीकरण, डीजिटल स्क्रीनद्वारे पॉवर प्रेझेंटेशन अशा सोयी सुविधांचे समितीच्या सदस्यांनी कौतुक केले. ग्रामपंचायतीने गावाच्या हद्दीत वीस हजारांहून अधिक वृक्षांची लागवड करून त्यांचे शंभर टक्के केलेल्या संगोपनामुळे लोणी गाव हरित झाले आहे. गावातील सार्वजनिक शौचालये आणि डिजिटल अंगणवाड्या कौतुकास्पद आहेत. समितीच्या सदस्यांनी गावची पाहणी करताना अनेक स्तरातील नागरिकांशी थेट संवाद साधून चर्चा केली.

 

 

समितीमध्ये उपायुक्त मित्र गोत्री, सहाय्यक आयुक्त श्री. माळवदे, उपयुक्त श्री. बनकर, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ. उज्ज्वला बावके, जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुदर्शन कालिके, सौ. परिहर, माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे, विभागीय समन्वयक दिनेश मोहळे, किरण माळवे आदींचा समावेश होता.

 

 

यावेळी सर्व सदस्यांना तुळशीची रोपे व लढत कादंबरी भेट देण्यात आली. माजी सरपंच काशिनाथ विखे, तंटामुक्तीचे अध्यक्ष संपतराव विखे, माजी उपसभापती सुभाष विखे, प्रवरा बँकेचे माजी संचालक किसनराव विखे, सरपंच लक्ष्मण बनसोडे, उपसरपंच अनिल विखे, विकास सोसायटीचे अध्यक्ष चांगदेव विखे, उपाध्यक्ष किशोर धावणे, माजी उपसरपंच अनिल विखे, सदस्य गणेश विखे, राहुल धावणे, लक्ष्मण विखे, भाऊसाहेब विखे, शांताराम भालेराव, बंडू विखे, सचिन विखे, चंद्रकांत म्हस्के, खंडू धावणे, ग्रामविकास अधिकारी सौ. कविता आहेर आदी उपस्थित होते.

 

लोणी बुद्रुकचे वेगळेपण विकासातून: सरपंच बनसोडे लोणी बुद्रुकचे वेगळेपण विकासातून: सरपंच बनसोडे  विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे, विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांचे मार्गदर्शन व सहकार्यामुळे लोणी बुद्रुक गावाने सर्वांगीण विकास साधत देशात वेगळी ओळख निर्माण केली आहे. पंधरा हजार लोकसंख्या आणि पंचवीस हजार तरंगती लोकसंख्या यांच्यासाठी सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सुविधा देण्याबरोबरच सर्व प्रकारचे यशस्वी व्यवस्थापन करणारी ही राज्यातील एकमेव ग्रामपंचायत असल्याचे सरपंच लक्ष्मण बनसोडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*