संजू सॅमसनचे डिसेंबरमध्ये शुभमंगल!

0

तिरुवनंतपुरम । केरळचा क्रिकेटर संजू सॅमसनने आपल्या लग्नाची घोषणा केली आहे. संजू सॅमसनने म्हटलंय की, तो यावर्षी डिसेंबरमध्ये विवाह करणार आहे. कॉलेजच्या मैत्रिणीसोबत संजूने विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. केरळचा राहणारा 23 वर्षीय विकेटकीपर संजू सॅमसनने त्याच्या इन्स्टाग—ाम अकाऊंटवरुन याची घोषणा केली आहे.

संजूने त्याची होणारी पत्नी चारूसोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. त्याने म्हटलं की, ‘22 ऑॅगस्टला 2013 ला त्याने रात्री 11.11 वाजता एक हाय पाठवलं होतं. त्या दिवसापासून आतापर्यंत 5 वर्ष झाले आहेत. मी त्या व्यक्तीसोबत एक फोटो शेअर करण्याची उत्सूकतेने वाट बघत होतो. जगाला सांगू इच्छितो की मी तिच्यावर प्रेम करतो. ही माझ्यासाठी खूप खास आहे.’

संजू सॅमसनने पुढे म्हटलं आहे की, ‘आम्ही एकत्र वेळ घालवतो. पण सार्वजनिक ठिकाणी फिरू शकत नव्हतो. पण आजपासून फिरु शकतो. आमच्या नातेवाईकांचे आभार ज्यांना या नात्याला आनंदाने स्विकारलं.

चारूचे वडील बी.रामेश कुमार एक वरिष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी म्हटलं की, 22 डिसेंबरला या दोघांचा विवाह होणार आहे. दोघेही मार इवानियोस कॉलेज मध्ये एकत्र शिकत होते. दोन्ही कुटुंबाच्या आशिर्वादाने हा विवाह होत आहे. चारू ही सध्या पोस्ट ग—ॅज्यूएशन करत आहे. आयपीएल मध्ये संजू सॅमसन यावर्षी राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता.

LEAVE A REPLY

*