संजय कोठारी यांची नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सचिव पदी निवड

0
निवृत्त आयएएस अधिकारी संजय कोठारी यांची नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सचिव पदी आणि गुजरात केडरचे वरिष्ठ वन अधिकारी भारत लाल यांची संयुक्त सचिवपदी निवड झाली आहे.
तर ज्येष्ठ पत्रकार अशोक मलिक यांची रामनाथ कोविंद यांच्या प्रेस सचिव पदी नियुक्ती झाली आहे.
कार्मिक व प्रशिक्षण विभागाने या नियुक्ती संदर्भातील पत्रक जारी करून ही माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेतृत्व केलेल्या मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने दोन वर्षासाठी या तीन पदांवरील व्यक्तींची नियुक्ती केली आहे.

LEAVE A REPLY

*