संजयनगर परिसरातील युवकाचे अपहरण

दीड वर्षापासून गायब असलेल्या तरुणाची हत्या झाल्याचा संशय

0
पंचवटी | दि. २३ प्रतिनिधी – पंचवटीतील संजयनगर परिसरातून सुमारे दीड वर्षापूर्वी २३ वर्षीय तरुण गायब झाल्यानंतर याबाबत पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी यावरून तपास केला असता दडी वर्षापूर्वी गायब झालेल्या या तरुणाचे अपहरण झाल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी परिसरांतील दोघा सराईत गुन्हेगारांवर आज गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान अपहृत तरुणाची हत्या झाल्याचा संशय पंचवटी पोलिसांना असून त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला आहे. यात अजूनही काही संशयितांचा समावेश असल्याचे उघड होत आहे. पंचवटीतील जालिंदर उर्फे ज्वाल्या अंबादास उगलमुगले (वय २३, रा.संजयनगर, पंचवटी) हा १ आक्टोबर २०१५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घरातून गेला तो अद्यापपर्यत परतला नाही.

दरम्यान त्यावेळी जालिंदर याच्या घरच्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद दिली होती. त्या दिवसापासून पंचवटी पोलिसांनी जालिंदर याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केला होता. दरम्यान मागील आठवड्यात पाथरवट लेन परिसरांत रात्रीच्या वेळी वाल्मिकनगर परिसरांत ३० ते ४० जणांच्या टोळक्याने हातात धारधार शस्त्रे घेऊन वाहनांची तोडफोड करीत दहशत पसरविली होती.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून काही संशयितांना अटक केली. या संशयितांची कसून केलेली चौकशी व गोपनीय माहितीच्या आधारे दीड वर्षापूर्वी गायब झालेल्या जालिंदर उर्फे ज्वाल्या यांचे काही संशयितांनी अपहरण केल्याची माहिती पुढे आल्याने या माहितीच्या आधारे पोलिसांनी आज संशयित अविनाश कौलकर व रोहित कडाळे(रा.संजयनगर, पंचवटी) यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान संशयित जालिंदर यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कट रचून अपहरण केल्याची दाट शक्यता असून त्यांची हत्या झाल्याचा पोसिांचा संशय बळावला आहे. यामुळे पोलीसांनी त्या दिशेने तपास सुरु केला आहे. तर यात अजूनही काही संशयितांचा समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त होत आहे.

LEAVE A REPLY

*