संघटन वाढविण्यावर भर ः प्रदेशाध्यक्ष टिळेकर

0

भाजप युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी बैठकीचा समारोप

 

शिर्डी (प्रतिनिधी)- 2019 ची विधानसभा व लोकसभा डोळ्यासमोर ठेवून राज्यात युवा मोर्चाचे संघटन वाढवण्यावर भर देण्यात आला असुन महाविद्यालयीन युवक व युवतींना कॉलेज कनेक्टच्या युवा मोर्चात सहभागी करून घेण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

 

फडणवीस सरकारला तीन वर्ष पुर्ण होण्याच्या पार्श्वभुमीवर 31 ऑक्टोंबर रोजी मुंबईत पाच लाख तरूणाचे महासंमेलन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आ. योगेश टिळेकर यांनी शिर्डी येथे पत्रकार परिषदेत दिली.

 

 

प्रदेश भाजप युवा मोर्चाची प्रदेश कार्यकारणीची दोन दिवसांची बैठक पार पडली. या बैठ्ठकीनंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना आ. योगेश टिळेकर बोलत होते. यावेळी आ. संतोष दानवे, आ. उन्मेश पाटील, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण दटके, आ. राजू तोडसाम, जिल्हाध्यक्ष सचिन तांबे आदी मान्यवर उपस्थीत होते. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष आ. योगेश टिळेकर म्हणाले की, भाजपाचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष अमित शहा राज्याच्या दौर्‍यावर आले असता आम्ही युवा मोर्चाच्या माध्यमातून एका वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांच्यासमोर सादर केला आहे

 

 

. राज्यात युवा मोर्चाचा कार्यविस्तार करण्यासाठी राज्यात दहा हजार युवा मोर्चाच्या शाखा सुरू करण्यात येणार आहे.

 

 

महाविद्यालयीन युवक व युवतींना युवा मोर्चात सहभागी करून घेण्यासाठी कॉलेज कनेक्ट चळवळ हाती घेतली जाणार आहे. यापुर्वी पंधरा वर्षे तत्कालीन सरकारच्या विरोधात युवा मोर्चाने संघर्ष करण्याची भुमीका घेतली होती. आता आम्ही सत्तेवर असल्याने सरकारच्या लोकोपयोगी योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्यातील व केंद्रातील भाजप सरकार सामान्यांच्या विकासासाठीच काम करीत असून परिवर्तनाच्या दिशेने राज्याची सुरवात झाली आहे.

 

 

जीएसटीमुळे देशात आर्थीक क्रांतीची बीजे रोवली जात आहे. यापुढे सरकारी योजनांत लोकसहभाग वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी युवा मोर्चाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे असेही प्रदेशाध्यक्ष आ. टिळेकर यांनी सांगितले.

 

 

युवा मोर्चाने घे भरारी या कार्यक्रमाद्वारे 25 ते 40 वयोगटातील स्थानिक स्वराज्य संस्था व विधीमंडळातील लोकप्रतिनिधीचे सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव जिल्हा सातारा येथे एक दिवसांचे अधिवेशन घेणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना निमंत्रीत करणार आहे.

LEAVE A REPLY

*