संगमनेर नगरपालिकेला दोन कोटी रुपयांचा पुरस्कार

0

संगमनेर (प्रतिनिधी) – नगर विकास दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यात स्वच्छता, नागरी सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कार्यालयीन कामकाज, ऑडिटचा अ दर्जा, पर्यावरण या वेगवेगळ्याा क्षेत्रांत उल्लेखनीय काम केल्याबद्दल संगमनेर नगरपालिकेला महाराष्ट्र शासनाच्या वतीने उत्कृष्ट नगरपरिषद म्हणून सन्मानित करून दोन कोटी रुपयांचा पुरस्कार देण्यात आला.

 
मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे व नगरसेवकांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री रणजित पाटील, राज्यमंत्री राज पुरोहित, सचिव श्रीमती म्हैसकर, विरेंद्रसिंग, आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे, उपनगराध्यक्ष नितीन अभंग, विश्‍वासराव मुर्तंडक, मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर आदीं मान्यवर उपस्थित होते.

 
स्वच्छता, नागरी सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कार्यालयीन कामकाज, ऑडिटचा अ दर्जा, पर्यावरण या विविध विभागांतील कामांच्या स्पर्धेत संगमनेर नगर पालिकेने नाशिक विभागातून दोन कोटींचा हा पुरस्कार मिळविला. राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली या नगरपालिकेने सातत्याने लोकाभिमुख कामे करुन आपला राज्यात ठसा उमटविला आहे. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी सतत नागरिक व महिलांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करुन स्वच्छ व हरित संगमनेर बनविण्यासाठी काम केले आहे.

 

शहरात वैभवशाली इमारतींसह 28 नव्या उद्यानांची निर्मिती, संगमनेर बाह्यवळण रस्ता, प्रवरा नदीवर चार पूल, रस्ते, भूमिगत गटारी, मोकळ्या जागांमध्ये वृक्षारोपण अशी विविध विकास कामे शहराचे वैभव ठरले आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणी आणून शहराला स्वच्छ व मुबलक पाणी दिले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेले संगमनेर शहर हे दूरदृष्टी नेतृत्वामुळे राज्यातील सुसंस्कृत व सुरक्षित शहर ठरले आहे.

 

यावेळी मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे म्हणाल्या, की सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्वच्छ सुंदर व हरित संगमनेरचे स्वप्न पाहिले. याकामी सर्व नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते, कर्मचारी व नागरिक यांनी मोठे सहकार्य केले. हा पुरस्कार मिळाल्याने निश्चितच आनंद झाला असून या यशात सर्वांचा मोलाचा वाटा आहे. याप्रसंगी नगरसेवक डॉ. दानिश पठाण, शेख पीर महंमद, किशोर टोकसे, शैलेश कलंत्री, रिजवान शेख, वसीम शेख, अरिफ देशमुख, अभियंता तळेकर, कार्यालयीन प्रतिनिधी राजू गुंजाळ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*