संगमनेरात 4 मोबाईल कंपन्यांचे टॉवर सील

0

संगमनेर (प्रतिनिधी) – मालमत्ता कराची थकबाकी न भरल्यामुळे शहरातील विविध 4 मोबाईल कंपन्यांचे टॉवर सील करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी दिली आहे.

 
विशेष वसुली मोहिमेअंतर्गत मालमत्ता कराची थकीत रक्कम न भरल्यामुळे देवीगल्ली भागातील राजेंद्र केरुजी गुंजाळ यांच्या इमारतीवर असलेला ए. टी. सी. मो. कं. टॉवर थकबाकी 98 हजार 939 रुपये, कुंभार आळा येथील संत शिरोमणी गोरोबा कुंभार ट्रस्टच्या इमारतीवरील चेन्नई नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर लि. मो. कंपनी थकबाकी 3 लाख 70 हजार 621 रुपये, रंगारगल्ली भागातील कासार समाजाच्या कालिका मंदिराच्या इमारतीवरील जी. टी. एल. इन्फ्रास्ट्रक्चर लि. मो. कंपनी थकबाकी 1 लाख 4 हजार 989 रुपये तसेच नवीन नगर रोड भागातील मुकुंद शाम सुंदर चांडक यांच्या इमारतीवरील चेन्नई नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर लि. मो. कंपनी थकबाकी 1 लाख 45 हजार 5 रुपये या मोबाईल कंपन्यांवर जप्ती अंतर्गत केलेल्या कारवाईत सदर टॉवर सील करण्यात आले आहे.

 
प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल यासंह राजेंद्र पिंपरकर, अल्ताफ शेख, अनिल काळण, अल्लाख शेख, नजीर शेख, माधव पावबाके आदी कर्मचारी जप्ती मोहिमेत सामील होते.

LEAVE A REPLY

*