संगमनेरात डास निर्मूलनासाठी जंतुनाशक फवारणी

0

संगमनेर (प्रतिनिधी) – सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरात डासांचा प्रभाव होऊ शकतो. यापासून डेंग्यू, मलेरिया यासारखे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता असते. भविष्यात होणार्‍या या आजारांपासून संरक्षण होण्यासाठी संगमनेर नगर परिषदेच्यावतीने डास निर्मूलनासाठी जंतुनाशक फवारणीस सुरुवात केली असल्याची माहिती नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी दिली.

 

 

पावसाळ्याच्या दिवसात डबक्यांमध्ये साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊ शकते. तसेच आपल्या घरांच्या छतावर टायर, फुटके डबे, व इतर अडगळीचे निरुपयोगी सामान ठेवलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डास निर्माण होण्याचा धोका असतो. डासांमुळे साथीचे आजार होतात. यावर वेळीच उपाय योजना म्हणून जंतुनाशक फवारणीस सुरुवात करण्यात आली आहे. नाल्यांमध्ये डास होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्व नाल्यांमध्ये मलेरियन ऑईल टाकण्यात येत आहे. धुरळणी व फवारणी इत्यादी कामेही सुरु असून पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी शहरात विविध फळझाडे बिट्टी, बांबू, कन्हेर, टिकोमा, बोगनवेल सारखी फुलझाडे लावली आहे.

 

 

 

शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे, शहर स्वच्छ, सुंदर व हरित राहावे यासाठी नगरपालिकेच्यावतीने प्रयत्न सुरु असून या सर्व उपक्रमांत सुजाण संगमनेरकरांनी सहकार्य करावे असे आवाहनही नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष नितीन अभंग, आरोग्य समिती सभापती डॉ. दानीश खान, सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*