संगमनेरमध्ये दरोडा, वृध्द दाम्पत्यास लुटले

0

संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर तालुक्यातील वरुडी फाटा येथे एका घरावर दरोडा घालून 4 ते 5 दरोडेखोरांनी एका वृद्ध दाम्पत्यास लुटल्याची घटना बुधवार मध्यरात्री 2 ते 3 वाजताच्या सुमारास घडली. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास वरूडी फाटा येथे सुदाम आगलावे(वय-65), त्यांची पत्नी राहिबाई आगलावे (वय-60) यांच्या राहत्या घरात दरोडेखोरांनी प्रवेश केला. या वृध्द दाम्पत्यास दरोडेखोरांनी जबर मारहाण केली. राहीबाई गंभीर जखमी झाल्या आहेत. दरोडेखोरांनी आजूबाजूला असणार्‍या घरांना बाहेरून कड्या लावून घेतल्या. त्यानंतर सुदाम व त्यांच्या पत्नीस मारहाण केली. घरातील रोकड व अंगावरील सोन्याचे दागिने काढण्यास त्यांनी बजावले. दरोडेखोरांनी लाकडी दांड्याने सुदाम आणि त्यांच्या पत्नीस मारहाण करून त्यांच्याकडील चाव्या घेतल्या. पेटीतील रोख 50 हजार रूपये आणि अन अंगावरील अंदाजे दोन तोळे सोन्याचे दागिने घेऊन त्यांनी पोबारा केला.
सुदाम आगलावे यांनी दोन दिवसांपूर्वी 50 हजार रुपये पिक कर्ज काढले होते. दरोडेखोरांच्या मारहाणीत राहीबाई यांच्या उजव्या पायाला गंभीर जखम झाली असून, पाठीवर गंभीर दुखापत झाली. या हल्यात सुदाम आगलावे किरकोळ जखमी झाली.

LEAVE A REPLY

*