Type to search

क्रीडा

श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर खेळणार !

Share

नागपूर । चौथ्या क्रमांकावर कुणाला खेळवायचे? या प्रश्नाचे उत्तर आता मिळालेले आहे. यापुढे मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये युवा फलंदाज श्रेयस अय्यर हा चौथ्या

क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणार आहे. संघ व्यवस्थापनाने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सांगितले असल्याचे श्रेयसने सांगितले. भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगनंतर मर्यादित षटकांच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर कुणाला खेळवायचे असा प्रश्न टीम इंडियासमोर होता. व्यवस्थापनाने या क्रमांकावर अनेक फलंदाजांना खेळण्याची संधी दिली. वेळोवेळी वेगवेगळे प्रयोगही झाले. यावरून व्यवस्थापनाला टीकाही झेलावी लागली. मात्र, चौथ्या क्रमांकावर योग्य निवड करण्यात संघ अपयशी ठरला. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत अनेक खेळाडूंना या क्रमांकावर खेळवण्यात आले. मात्र, कुणालाही ही जागा मिळवता आली नाही. क्रिकेटच्या या महाकुंभमेळ्यात विजय शंकर यालाही संधी देण्यात आली. मात्र, हा प्रयोगही अपयशी ठरला. बांगलादेशविरुद्ध तिसर्‍या आणि अखेरच्या टी-20 लढतीत श्रेयस अय्यरने 33 चेंडूत 62 धावांची तडाखेबंद खेळी केली. यानंतर त्याने माध्यमांशी संवाद साधला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहेस, स्वत:वर विश्वास ठेव असे संघ व्यवस्थापनाकडून मला सांगण्यात आले आहे,अशी माहिती श्रेयसने दिली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी माझी निवड होण्यास गेल्या काही मालिका महत्वपूर्ण ठरल्या. या क्रमांकावर खेळण्यासाठी आमच्यात जणू एकप्रकारे स्पर्धाच सुरू होती, असेही श्रेयस म्हणाला. टीम इंडियातील दोन प्रमुख फलंदाज कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा हे लवकर बाद झाले तर, श्रेयस मफिनिशरफची भूमिका निभावणार आहे, असेही मानले जात आहे. जर विराट कोहली आणि रोहित शर्मा हे बाद झाले तर आम्हाला शेवटपर्यंत मैदानावर टिकून खेळणारा फलंदाज हवा आहे. हीच भूमिका चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणार्‍या खेळाडूची असते. मी आज तेच करण्याचा प्रयत्न केला आणि एकूणच चांगली खेळी केली, असे श्रेयस म्हणाला. अय्यर गेल्या काही

सामन्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरत असला तरी, संघाच्या गरजेनुसार कोणत्याही क्रमांकावर खेळण्याची तयारी त्याने दाखवली आहे. ममी वास्तवात खुलेपणाने बोलतो. मी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार आहे.

म्हणून मी कोणत्याही कठीण परिस्थितीत स्वत:वर विश्वास ठेवतो आणि मी दबावातही खेळू शकतो हे आजच्या खेळीने दाखवून दिले आहे,फ असे श्रेयस अय्यर म्हणाला. संघ व्यवस्थापनाने मलाच नव्हे, तर संघातील सर्व खेळाडूंना मर्जीप्रमाणे खेळण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. फलंदाजी करताना सकारात्मक असावे लागते, असेही तो म्हणाला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!