Type to search

जळगाव

श्री ओम साई विठ्ठल रुखमाई मंदिरात आज विविध कार्यक्रम

Share

जळगाव । महाबळ परिसरातील नुतन वर्षा कॉलनी मधील विठ्ठल रुख्माई मंदिरात आषाढी एकादशीची तयारी पूर्ण झाली आहे. महिला मंडळ भगिनींनी मंदिर गाभारा धुवून पूर्ण परिसर स्वच्छ केला आहे. मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून भाविकांच्या सेवेसाठी वाटरप्रुफ मंडप टाकण्यात आला आहे.

दि. 12 रोजी सकाळी 6 ते 8 दरम्यान महाभिषेक व आरती मान्यवर यजमान शेखर चव्हाण (मुंबई) यांच्याहस्ते होईल. सकाळी 8 ते 10 पंचक्रोशीतून येणार्‍या दिंड्यांचे स्वागत व भजनाचा कार्यक्रम होईल. 10 ते 12 साबुदाणा प्रसाद वाटप, सायंकाळी 5 ते 7.30 दरम्यान मान्यवरांच्या हस्ते आरती होईल. उपस्थितीचे आवाहन रवी सपकाळे, सुरेश पाटील, सच्चिदानंद कोळी, प्रियंका महाजन, मंगला चौधरी, प्रतिभा बाविस्कर आदींनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!