श्रीलंकेतील बॉम्बस्फोटामुळे धक्का- विराट

0
दिल्ली । श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यात 450 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने बॉम्बस्फोटाच्या घटनेने मोठा धक्का बसल्याचे म्हटले आहे. आम्ही या हल्ल्यातील मृतांच्या नातेवाइकांच्या दु:खात सहभागी असून त्यांना सावरण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थनाही त्याने केली आहे.

जगभरात ईस्टर संडे साजरा केला जात असताना श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटांनी हादरलं आहे. आतापर्यंत 8 ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात 99 जणांचा मृत्यू तर 450 हून अधिक लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, या हल्ल्यामागे घ्एघ्चा हात असल्याची माहिती समोर आली आहे. पण अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

ईस्टर संडेच्या पवित्र दिनीच चर्चवर हल्ला करण्यात आला. एक स्फोट कोलंबोतील पोर्टच्या कोचीकडे चर्चमध्ये तर दुसरा हल्ला पुत्तलम जवळच्या सेंट सेबेस्टियन चर्चमध्ये झाला. याशिवाय मार्केटमध्येही हल्ला झाल्याची माहिती समजते.कोलंबोतील शांगरीला हॉटेल आणि किंग्जबरी हॉटेलमध्येसुद्धा बॉम्बस्फोट झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी पहिला बॉम्बस्फोट झाला.

LEAVE A REPLY

*