श्रीराम मंदिर संस्थानतर्फे ‘गुढीपाडवा’निमित्त स्वागत यात्रा

0

जळगाव | प्रतिनिधी :  जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थांतर्फे ‘गुढीपाडवा’निमित्त दि.२८ रोजी शहरात हिंदु नववर्ष स्वागत यात्रा जल्लोषात काढण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

शहरातील विविध पंथ, संप्रदाय, उपासना केंद्र, गणेश मंडळ, सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने सालाबादाप्रमाणे यावर्षीही हिंदु नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नियोजनासाठी ह.भ.प. मंगेश महाराज यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत नववर्ष स्वागतयात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीला दिपक जोशी, छोटू नेवे, गिरीष कुळकर्णी, ऋषाली देशपांडे, कवि कासार, योगेश कासार, भैय्या गाडगे, अशोक माळी, संजय कोरके, मनोज चौधरी, बापू माळी, प्रणव जोशी, सागर शिंपी, देवेश पाठक, चंद्रकांत दाभाडे, शशिकांत देशपांडे, भुषण जगताप, अमित पंडीत, सुमित पंडीत, वसंत सुतार, परीष तांबट, सुनिल शिंपी, बापू सपके, प्रविण बारी, नंदु शुक्ल, राकेश शिरसाठे आदी उपस्थित होते.

सुत्रसंचलन मुकुंद धर्माधिकारी यांनी केले. स्वागत यात्रा गायत्री मंदिरापासून काढण्यात येणार असून दक्षीणमुखी मारुती मंदिर, इच्छापूर्ती गणपती मंदिर, जयप्रकाश नारायण चौक, टॉवर चौक, सुभाष चौक, सराफ बाजार मार्गे रथ चौकात यात्रेची सांगता करण्यात येईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता महाआरती झाल्यानंतर गावगुढी पूजन करण्यात येणार आहे.

शनिवारी बैठक

हिंदु नववर्ष स्वागत यात्रेच्या नियोजनासाठी दि.२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजता आरती अपार्टमेंट गणानाम भवन एम.जे.कॉलेज मागे येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*