श्रीराम नवमीनिमित्त काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्रोत्सव

0

पंचवटी । दि. २५ प्रतिनिधी – श्री काळाराम संस्थानतर्फे सालाबादप्रमाणे वासंतिक नवरात्र महोत्सव होत आहे.

श्रीराम जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह प्रामुख्याने श्रीराम जन्मोत्सव, श्रीराम व गरूड रथयात्रा तसेच भावगीत, भक्तिगीत यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री काळाराम संस्थान आयोजित वासंतिक नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी (दि.28) सायंकाळी 5 वाजता पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्या हस्ते होईल.

अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण एम. ढवळे उपस्थित राहतील.

उद्घाटनप्रसंगी मानसी पाटील व सहकारी यांचा भावगीतांचा कार्यक्रम तर संस्कृती कार्यक्रमात रात्री 8 वाजता श्रेयसी राय यांचा ‘रामरंग’ हा हिंदी/मराठी भाव-भक्तिगीतांचा कार्यक्रम होईल.

बुधवार (दि.29) ते रविवार (दि.2) या कालावधीत सायंकाळी 5.30 वाजता विवेक घळसासी यांचे ‘राष्ट्रचैतन्य श्रीराम’ या विषयावर व्याख्यान होईल.

सांस्कृतिक कार्यक्रमात दि.29 रोजी सायंकाळी 8 वाजता शिल्पा देशमुख यांचे ‘नाचू कीर्तनाचे रंग’ हा नृत्य-गायन-कीर्तनाचा कार्यक्रम, दि.30 रोजी चंदाताई जगदीश तिवाडी यांचे भजनी भारूड, दि.31 रोजी कलानंद कथ्थक नृत्यसंस्थेच्या संजीवनी कुलकर्णी ‘कृष्णकथा’ हा संगीत नृत्यमय नाटिका सादर करतील.

1 एप्रिल रोजी सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांचा ‘भक्तिरंग’ भाव-भक्तिगीतांचा कार्यक्रम होईल.

दि.2 रोजी जयंत नाईक श्री गुरुकृपा तबला परफॉर्मिंग अकादमीचा ‘रंग त्रितालाचे, दि.3 रोजी डॉ. रुचा देव-हिर्लेकर यांचा राष्ट्र जागरणासाठी गीतरामायण हा कार्यक्रम होणार आहे.

दि.5 रोजी सायंकाळी प्रमोद केणे यांचे गिरनार परिक्रमा, दि.6 रोजी तुळशीराम महाराज गुट्टे यांचे पसायदान व डॉ.अनिता कुलकर्णी यांचे रामायणातील राजस्त्रीया या विषयावर व्याख्यान होणार आहे.

दैनंदिन कार्यक्रमात पहाटे श्रींची काकड आरती, सनईवादन व भूपाळी, श्रींची मंगल आरती, उदयबुवा कुलकर्णी यांचे कीर्तन, श्रींची महापूजा महान्यास, दुपारी आध्यात्मिक रामायण पारायण, सायंकाळी श्रींची शेजारती आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

वासंतिक नवरात्र महोत्सवाचे यंदाचे मानकरी चंदनबुवा दिलीपराव पूजाधिकारी आहेत. त्यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार असून भाविकांनी धार्मिक सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री काळाराम संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

विशेष कार्यक्रम

शनिवारी (दि.1) सकाळी 11 वाजता प्रभू श्रीरामास तुलसी अर्चन, रविवारी (दि.2) सकाळी 7 वाजता सामूहिक रामरक्षास्तोत्र पठण तसेच मोहन उपासनी व सहकारी यांचे ‘वेणूरमधुरम’ कार्यक्रम होईल.

सोमवारी (दि.3) दुपारी 12 वाजता सप्तमी महाप्रसाद, मंगळवारी (दि.4) दुपारी 12 वाजता श्रीराम नवमी जन्मोत्सव होईल. शुक्रवारी (दि.7) सायंकाळी 5 वाजता श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथून श्रीराम व गरूड रथयात्रेस प्रारंभ होईल.

LEAVE A REPLY

*