श्रीरामपूर ः वाळू तस्करांविरुध्द सिनेस्टाईल कारवाई

0

वांगीत वाळूच्या चार गाड्या पकडल्या; गुन्हा दाखल

 

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील वांगी शिवारात वाळुची तस्करी जोरात सुरु असल्याचे कळाल्यावरुन श्रीरामपूरचे तहसीलदारांनी मोटारसायकलवर प्रवरा पात्रात जावून सिनेस्टाईल छापा टाकला. अचानकपणे तहसीलदार व त्यांची माणसे आले असल्याचे पहाताच त्यांची भंबेरी उडाली. तहसीलदार व त्यांच्या पथकाने वाळूने भरलेल्या चार ट्रक पडकल्या. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

श्रीरामपूर तालुक्यातील वांगी शिवारातील प्रवरा नदी पात्रात वाळु तस्कर व ग्रामस्थांमध्ये नेहमीच बाचाबाची होत असते. यात राहुरी तालुक्यातील वाळू तस्करही मोठ्या प्रमाणावर वाळु तस्करी करत असतात. त्यांच्याविरुध्द कारवाई करण्याअगोदरच त्यांचे हितचिंतक हे तहसीलदारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात त्यामुळे काल श्रीरामपूरचे तहसीलदारांनी या सर्वांना हुलकावणी देत काल मोटारसायकलवरुन जाण्याचा निर्णय घेतला.

 

 

तहसीलदार श्री. दळवी हे रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरुन प्रवरानदीपात्रात जात असताना वाळू तस्करांना वाटले की, आपल्यातीलच कोणी तरी आले असे म्हणून ते बेसावध राहिले परंतु अन्य तहसीलदारांच्या लोकांनी गराडा घातला त्यावेळी वाळू तस्करांची भंबेरीच उडाली. त्यांनी तातडीने पळ काढण्यास सुरुवात केली. वाळू तस्कर पळून गेले. या पथकाने एमएच 20 ए 9317, एमएच 17 एएस 9869, एमएच 15 क्यु 3075 तर एमएच 04 सेटे 6501 या क्रमांकांच्या ट्रकमध्ये प्रमाणापेक्षा जास्त वाळू भरुन ती घेवून जाण्याच्या बेतात होते परंतु तहसीलदारांनी टाकलेल्या या नाट्यमयरित्या छाप्यात या वाळू तस्करांना गाड्या टाकून पळ काढावा लागला.

 

 

या पथकाने या चारही ट्रक जप्त केल्या व पोलिसांना पाचारण केले. तहसीलदारांनी पोलिसांना बरोबर घेवून कारवाई केली असती तर हे वाळूतस्करही जाळ्यात उतरले असते परंतु त्यांना कळविले असते तर या चार गाड्याही भेटल्या नसता असा संशयही व्यक्त करण्यात आला. त्यामुळे तहसीलदारांनी एकट्यांनी केलेली आगळीवेगळी आणि सिनेस्टाईल कारवाईच यशस्वी ठरली. श्रीरामपूर तहसीलदारांनी केलेल्या कारवाईबाबत अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

*