श्रीरामपुरात 41 पोते गुटखा जप्त

0

टेम्पो ट्रॅव्हलर जप्त; मालक व चालक जेरबंद

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- एका टेम्पो ट्रॅव्हलरमधून तीन लाखाचा गुटखा जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शहरातील शिवाजी चौकात सापळा लावून टेम्पो ट्रॅव्हलर पकडला असता त्यामध्ये सुमारे तीन लाखाचा हिरा नावाचा बनावट गुटखा आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी टेम्पो ट्रॅव्हलरचा मालक व चालकाला अटक केली आहे. ही कारवाई श्रीरामपूर शहर पोलिसांनी केली.

श्रीरामपूर शहरातून गुटखा जात असल्याची माहिती पोलीस वरिष्ठ अधिकार्‍यांना मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, पोलीस उपअधीक्षक प्रताप बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जे. के. लोंढे, ए. ए. हबीब, एस. डी. नानेकर, पोलीस नाईक विजयकुमार वेठेकर, शंकर चौधरी, शिवाजी ढाकणे, सुनील दिघे, अर्जुन पोकळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. काल सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास या पथकाने शिवाजी चौकात सापळा लावला.

या सापळ्यात एमएच 20 ए. एस. 3857 या टेम्पो ट्रॅव्हलर अडकला. या टेम्पोची तपासणी केली असता त्यात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होत असल्याचे आढळून आल्याने टेम्पोचा चालक व मालक दोघांनाही ताब्यात घेतले.
हिरा गुटखा कंपनीच्या नावाचा वापर करून बनावट गुटख्याची एकूण 41 पोते व प्रत्येक बॅगमध्ये 50 बॉक्स असा सुमारे तीन लाखाचा तसेच टेम्पो ट्रॅव्हलर असा एकूण एकूण 8 लाख 35 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

यात गुटखा वाहतूक करणारे मालक रफीक अब्दूल गफार मेमन (रा. काझीबाबा रोड, वॉर्ड नं. 2 श्रीरामपूर येथील चालक अमजद जब्बार पठाण रा. मिल्लुतनगर, वॉर्ड नं. 1 श्रीरामपूर या दोघांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यापुढील तपास अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त करणार आहेत.

LEAVE A REPLY

*