श्रीरामपुरात आजपासून ऊरूस

0

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहरातील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक हजरत सय्यद शहा कादरी बाबा यांच्या उरूसाची जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती उर्स कमिटीचे अध्यक्ष मुन्ना पठाण व विश्‍वस्त दिलावर पेंटर यांनी दिली.
शनिवार 1 एप्रिल 2017 रोजी संदल साजरा होणार असून सकाळी रेल्वे स्टेशनवरून फकीरांच्या आगमनानंतर 10.30 वा. फकिरांची मिरवणूक काढली जाणार आहे. तसेच धार्मिक परंपरेनुसार सायंकाळी 5 वाजता संदल मिरवणुकीची वाजत गाजत सुरुवात होऊन फकीर मंडळींसह मौलाना आझाद चौक, दशमेश चौक, कर्मवीर चौक मार्गे प्रांतकार्यालय, श्रीरामपूर पोलीस ठाणे यांची चादर घेऊन लक्ष्मी टॉकीज मार्गे सायंकाळी 7 वाजता दर्गाह समोरून मिरवणूक शिवाजी रोडवरून वसंत टॉकीजमार्गे मानाची चादर घेण्यासाठी डावखर बाबा यांच्या घरी जाणार आहे. मानाची चादर घेऊन मेनरोड मार्गे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनची चादर घेऊन सय्यद बाबा दर्गाहसमोर मिरवणूक आल्यानंतर दर्गाह उर्स मैदानात रात्री 10 वाजता आतषबाजी करण्यात येणार आहे.

 

त्यानंतर रात्रभर मिरवणूक वॉर्ड नं 2 मधून पहाटे 6 वाजता दर्गाहमध्ये येणार आहे. मिरवणुकीत विविध मिलाद पार्टीचे पठण तसेच फकीरांचे जरबचे कार्यक्रम होणार आहेत. सकाळी 6 वाजता संदल बाबांचे मजारीवर चढविल्यानंतर प्रथम श्री. डावखर बाबा यांची मानाची चादर चढविल्यानंतर तहसील कार्यालय, तालुका पोलीस ठाणे, शहर पोलीस ठाणे, होमगार्ड यांची चादर फकीरांचे धर्मगुरू मौलाना यांच्या उपस्थितीत चढविण्यात येईल. यावेळी इबादत (सर्वधर्मिय प्रार्थना), फातेहाख्वानी (आशिर्वाद), होऊन भाविकांना प्रसाद देण्यात येणार आहे.

 

रविवार दि. 2 एप्रिल 2017 रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसिध्द मुनव्वर मासूम यांचा कव्वालीचा कार्यक्रम तसेच सोमवार दि. 3 एप्रिल 2017 रोजी सायंकाळी रामरहीम फेस्टिव्हल, नगरपालिकेच्या सौजन्याने प्रसिध्द कव्वाल खलील शैद आणि नुरी सबा कव्वाल यांची जुगलबंदी पहावयास मिळणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मुन्ना पठाण, नजीरभाई शेख, रियाज पठाण, हाजी रफीक पोपटीया, मुख्तार शाह, रज्जाकखान पठाण, दिलावर पेंटर, असिफ बारूदवाला, आयाज तांबोळी, राजेश मगर, बाबा भजीवाले, साजीद खान, मुन्ना लखन, परवेज तांबोळी आदी प्रयत्नशील आहेत.

LEAVE A REPLY

*