श्रीदेवी ‘मिस्टर इंडिया २’ साठी सज्ज

0

बोनी कपूर यांनी ‘मॉम’ सिनेमाची निर्मिती केली आहे.

सध्या ते या सिनेमावर इतके खूश आहेत की लवकरच ते त्यांचं दुसरं प्रोजेक्टही घरच्या कलाकारांना एकत्र घेऊन करणार आहेत.

‘मिस्टर इंडिया २’ हा सिनेमा करण्याच्या बेतात बोनी कपूर आहेत.

मिस्टर इंडियामध्ये श्रीदेवी आणि अनिल कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. ब्लॉकबस्टर सिनेमांच्या यादीत आजही या सिनेमाचे नाव आवर्जुन घेतले जाते.

 सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोनी कपूर सध्या या सिनेमाच्या कथेवर काम करत आहेत. श्रीदेवी आणि अनिल यांच्यासोबत अजून एक जोडी या सिनेमात घेण्यात येणार असून जिथे मूळ ‘मिस्टर इंडिया’ची कथा संपते तिथून पुढे दुसऱ्या भागाची कथा सुरू होणार आहे. पण पुढचा भाग करायचा आहे म्हणून काहीही करण्यात अर्थ नाही हे बोनी पुरेपूर जाणून आहेत. म्हणून ते सध्या या सिनेमाच्या कथेवर फार मेहनत घेत आहेत.
मिस्टर इंडिया सिनेमाचे दिग्दर्शन शेखर कपूर यांनी केले होते. पण दुसऱ्या भागाचं दिग्दर्शन ते करणार नाहीत हे आधीच स्पष्ट झालं आहे. त्यामुळे ‘मिस्टर इंडिया २’ साठी राकेश ओमप्रकाश मेहरा किंवा ‘मॉम’ सिनेमाचे दिग्दर्शक रवी उद्यावर यांची नावे चर्चेत आहेत.

LEAVE A REPLY

*