शौचालयाच्या अनुदानासाठी महिलांची गांधीगिरी

0

भुसावळ |  प्रतिनिधी :  शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी पालिकेकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु असून उघड्यावर शौचास बसणार्‍यांवर पालिकेकडून कारवाई होत आहे.

मात्र दुसरीकडे शौचालय पूर्ण करणार्‍या लाभार्थ्यांना पालिकेकडून अनुदान मिळत नसल्याने प्रभाग क्र. १८ मधील महिलांनी मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी करत अनुदान देण्याची मागणी केली.

१४ व्या वित्त आयोगातून ५० टक्के रक्कम शौचालयासाठी अनुदान खर्च करण्यासाठी शासनाने आदेश दिले आहे. या अंतर्गत पालिकेला दोन हजार शौचालयांचे उद्दीष्ट असतांना फक्त ५०० शौचालय पूर्ण करण्यात आले आहे. बहुतांश लाभार्थ्यांचे अनुदान पालिकेतर्फे थांबविण्यात आल्याने प्रभागातील बहुतांश नागरिक अद्याप ही  उघड्यावर शौचास बसत आहे.

दुसरीकडे मात्र उघड्यावर शौचास बसणार्‍यांवर पालिका कार्मचार्‍यांकडून कारवाईचा धाक दाखविला जात आहे. पालिकेकडून घेण्यात येणारी भूमिक योग्य नसल्याच्या निषेधार्थ प्रभाग क्र. १८ मधील महिलांनी नितीन धांडे व नगरसेविका मीनाक्षी नितीन धांडे यांंच्या मार्गदर्शनाखाली दुपारी पालिकेत १२.३० वाजे दरम्यान धडक देत मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांच्या दालनात दाखल होऊन महिलांनी त्यांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी केली.

मुख्याधिकारी बविस्कर यांना निवेदन सादर करुन प्रभाग क्र.१८ मधील शौचालय अनुदान लवकरात लवकर मंजूर करण्याची मागणी केली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते नितीन धांडे, चित्रा कोळंबे, सुधाकर पाटील, विजय शंकर चौधरी, संदीप चौधरी, रेखा विजय जावळे, प्रभाकर पाटील, बन्सीलाल पाटील, रामलाल चंदन, शोभा चौधरी, सतिष ठोसर, विनायक नाफडे, अशोक पाटील, श्रीकृष्ण नवले, सुलभा टोंगळे, चंद्रकांत पाचपांडे, मंगला चौधरी, मनोज कोलते, गजानन पाटील, जितेंद्र वारके उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*