शॉटसर्कीटमुळे मेडिकल स्टोअरला आग

0

जळगाव / शहरातील महाबळ परिसरातील संभाजीनगर रोडवरील मेडीकल स्टोअर दुकानाला शॉटसर्कीटमुळे आग लागल्याने दुकानातील लाखो रुपयांच्या औषधीचे नुकसान झाल्याची घटना दुपारी 1.55 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबात प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेली माहिती अशी की, संभाजीनगर रोडवर सागर राजेंद्र बाविस्कर यांच्या मालकीचे माऊली मेडीकल जनरल स्टोअर दुकान आहे.

यावेळी अचानक दुकानातून धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या लक्ष्यात आले. त्यांनी तात्काळ याबाबत बाजुच्या दुकानदाराला माहिती दिली.

दुकानदाराने या प्रकाराबाबत मोबाईलवरून सागरला घटनेची माहिती दिली. सागरने घटनास्थळी धाव घेतली. आणि अग्निशमन विभागाला कळविले.

काही वेळात अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.

 

LEAVE A REPLY

*