Type to search

क्रीडा

शेवटच्या षटकातील खराब गोलंदाजीमुळे पराभव – विराट

Share
नवी दिल्ली । कोलकाता नाईट राइडर्सच्या विरुध्द पाच गडी राखून झालेल्या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने या पराभवासाठी संघाच्या खराब गोलंदाजीला जबाबदार ठरविले आहे.

कोहलीने सामन्यानंतर म्हटले की शेवटच्या चार षटकामध्ये संघाच्या गोलंदाजानी खूप खराब गोलंदाजी केली. जर आपण शेवटच्या चार षटकामध्ये 75 धावा वाचू शकलो नाहीत तर मला माहिती नाही की 100 धावा वाचू शकूत की नाही. या सीझनमध्ये ही आमची कहानी राहिली आहे जर आपण शेवटच्या महत्वाच्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी करु शकलो नाहीत तर रसेल सारख्या पॉवर हिटरच्या समोर सतत,मुश्किल होणार आहे.

बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली (84), अब—ाहम डिव्हिलियर्स (63) च्या उत्कृष्ट डावाच्या जोरावर निर्धारित 20 षटकामध्ये तीन गडी गमवून 205 धावाचा विशाल डोंगर उभा केला होता आणि या संस्करणातील आपला पहिल्या विजया बाबत आश्वस्त दिसत होते परंतु रसेलने आपल्या तुफानी अंदाजाचा परिचय देत कोलकाताला विजय मिळवून दिला.कर्णधार विराट कोहलीने म्हटले की मी ज्यावेळी बाद झालो त्यावेळी बिल्कुल आनंदी नव्हतो. 20-25 धावा अजून बनवू शकत होतो. शेवटच्या षटकामध्ये एबीला जास्त स्ट्राइक मिळू शकली नाही. मला वाटते की जितकी धावसंख्या आम्ही काढू शकलो ती खूप होती. आम्ही मानसिकपणे अजून जास्त संतुलित नव्हतोत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!