शेवगाव हत्या प्रकरण : आरोपींवर इनाम

0

पोलिसांची घोषणा, गूढ कायम

अहमदनगर (प्रतिनिधी) – शेवगाव येथील माजी सैनिक आप्पासाहेब हरवणे यांच्या कुटुंबातील चौघांची हत्या करणार्‍या आरोपीची माहिती देणार्‍याला पोलिसांनी 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. दरम्यान तिसर्‍या दिवशीही हत्येचे गूढ कायम असून मारेकर्‍यापर्यंत पोहचण्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
शेवगाव येथील इरिगेशन कॉलनीतील माजी सैनिक आप्पासाहेब हरवणे, त्यांची पत्नी सुनंदा (45), मुलगी स्नेहील (18) आणि मुलगा मकरंद (15) यांची निर्घृण हत्या झाल्याची घटना रविवारी समोर आली. पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकाच्या मदतीने तपासाला सुरुवात केली. मात्र संपूर्ण कुटुंबांची हत्या का करण्यात आली या प्रश्नाचं गूढ अजूनही उकललेले नाही. दरम्यान या हत्येचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्यासह ‘एलसीबी’चे पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे शेवगावात तळ ठोकून आहेत. तपासासाठी ‘एलसीबी’ची चार पथके तयार करण्यात आली आहेत.

चौकशी सुरूचौकशी सुरू हारवणे कुटुंबियांच्या मारेकर्‍यांपर्यंत पोहचण्यासाठी पोलिसांनी ‘जवळ’च्यांची चौकशी सुरू केली आहे. त्यातून हत्येचे कारण समोर येईल, त्या माध्यमातून पोलीस मारेरकर्‍यापर्यंत पोहचू शकतील असे पोलिसांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

*