शेवगावच्या चालकास लुटणारी टोळी गजाआड

0

16 लाखांचा माल हस्तगत

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी परिसरात वाहन चालक संजय सिताराम गुंजाळ (रा. दहेगाव, ता. शेवगाव) यांना अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना रविवारी (दि.6) पहाटेच्या सुमारास घडली होती. यात गुंजाळ यांच्याकडून 14 लाख 19 हजार रूपयांच्या ऍल्युमिनिअम पट्ट्या लुटल्या होत्या. या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहेत. त्यांच्याकडून 15 लाखांचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सचिन मुरलीधर भगत, महेश भानुदास थोरे, भहिरू लक्ष्मण मोरे (सर्व रा. बाबुर्डी घुमट) अशी आरोपींची नावे आहेत.

 

 

रविवारी पहाटे आरोपींनी एम. एच 16 एवाय 457 या टेम्पोतील ऍल्युमिनिअम पट्ट्यांसह 15 लाखांचा मुद्देमाल लुटला होता. नंतर हा टेम्पो श्रीगोंदा तालुक्यात एका निर्जनस्थळी सोडला होता. ही घटना गुंजाळ यांनी सोमवारी पोलिसांना सांगितली असता त्यांच्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना आज शुक्रवारी सकाळी चोरट्यांविषयी माहिती मिळाली होती.

 

 

पवार यांनी बाबुर्डी घुमट परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण 15 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस निरीक्षक गुट्टे, राजकुमार हिंगोले, भाऊसाहेब काळे, योगेश गोसावी, दत्तात्रय जपे, विजय वेठेकर, विजय ठोंबरे, संदीप घोडके, मल्लिकार्जुन बनकर, संदीप पवार, रोहित मिसाळ, रवी सोनटक्के, दिपक शिंदे, संभाजी कोतकर यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोरे करीत आहेत.

 

 

 

LEAVE A REPLY

*