शेततळ्यात बुडून शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू

0

भावीनिमगाव (वार्ताहर) – शेततळ्यात पोहायला गेलेल्या शालेय विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथे घडली. मयताचे नाव सागर शेषराव घनवट (वय-16, रा. भावीनिमगाव) असे आहे.

 
शनिवारी दुपारी वातावरणातील उकाडा वाढल्यामुळे थंडावा मिळावा म्हणून भावीनिमगाव येथील सागर शेषराव घनवट हा जवळच असलेल्या शेततलावामध्ये पोहण्यासाठी गेला होता. शेततलावामध्ये पोहून झाल्यानंतर शेततळ्याच्या बाहेर येत असताना तळ्याच्या काठावर धरण्यासाठी कसलाही आधार न मिळाल्याने तो पुन्हा शेततळ्यात पाय घसरून पडला.

 

आजुबाजूला कोणीही नसल्याने त्याला वेळेवर मदत मिळाली नाही. यामुळे शेततलावामध्ये त्याचा बुडून मृत्यू झाला. सागर घनवट घरी लवकर न आल्याने शोधाशोध केली असता शेततलावामध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. या दुर्दैवी घटनेने घनवट परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी रात्री त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

*