शेतकर्‍यांना मिळणार अल्पदरात भोजन

0
श्रीरामपूर बाजार समितीचा आदर्शवत निर्णय
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – कांदा उत्पादक शेतकर्‍यांना लिलावाच्या दिवशी दर बुधवार, शुक्रवार व रविवारी अल्पदरात जेवण उपलब्ध करून देण्याचा निर्णय श्रीरामपूर कृषिउत्पन्न बाजार समितीने घेतला असल्याचे समितीचे सभापती नानासाहेब पवार यांनी सांगितले.
कांदा लिलावास श्रीरामपूर तालुक्यातील व तालुक्याच्या बाहेरील अनेक शेतकरी कृषिउत्त्पन्न बाजार समितीत येत असून लिलाव संपेपर्यंत म्हणजेच सकाळपासून ते सायंकाळपर्यंत लिलावाच्या ठिकाणी थांबलेले असतात. त्यामुळे त्यांना बाहेरील हॉटेलमध्ये जेवण करण्यास जास्त पैसे मोजावे लागतात व वेळेचाही अपव्यय होतो. या सर्व गोष्टींचा विचार करून श्रीरामपूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्यावतीने लिलावासाठी आलेल्या शेतकर्‍यांसाठी बाजार समितीच्या पुढाकारातून व व्यापारी व स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने अल्प दरात जेवण उपलब्ध करून देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
यावेळी कृषिउत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन सुंदरभान भागडे, सुधीर वेणुनाथ नवले, नंदा भाऊसाहेब शेलार, विद्या भाऊसाहेब दाभाडे, फटांगरे मुक्ताजी विठ्ठल, आसने नितीन दत्तात्रय, शिंंदे संगीता सुनील, तोरणे राजेेंद्र यादवराव, मुठे विश्‍वनाथ, कैलास बोर्डे, राधाकृष्ण आहेर, जितेंद्र मदनलाल गदिया, भाऊसाहेब ज्योतिबा कांदळकर, भाऊसाहेब थेटे, काळे पांडुरंग व बाजार समितीचे सचिव काळे उपस्थित होते. लवकरच कृषिउत्पन्न बाजार समितीच्यावतीने कांदा आणणार्‍या शेतकर्‍यांसाठी लिलावाच्या दिवसी अल्प दराज जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे. या निर्णयाचे शेतकरी वर्गातून स्वागत करण्यात येत आहे.
संपाला पाठिंबा…
1 जून 2017 पासून राज्यातील शेतकरी संपावर जाण्याच्या आंदोलनास बाजार समितीच्यावतीने पाठिंबा देण्याच्या ठरावाची सूचना उपसभापती सचिन गुजर यांनी मांडली. त्यास डॉ. नितीन दत्तात्रय आसने यांनी अनुमोदन दिले. ठराव सर्वानुमते मंजूर झाला.

LEAVE A REPLY

*