शेतकर्‍यांना बंदी : संचालकांनी ट्रकने आणलेली तूर खाली केली!

0

जामनेर |  प्रतिनिधी :  तालुक्यातील शेतकर्‍यांची नव्याने विक्रीसाठी येणारी तुर येत्या सोमवार पर्यंत आणु नये असा फतवा येथील शेतकीसंघ आणि बाजार समितीने काढला असला तर ईकडे मात्र रातोरात संचालकानेच आपली तुर आधी ट्रॅक्टरने आणि नंतर चक्क ट्रकने आणुन बाजार समिती आवारात खाली केली. या प्रकाराने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात संतापला आहे.

एकट्या संचालकाचेच ३४५ तुरीचे कट्टे – बाजार समितीचे संचालक यांनी आधी ट्रॅक्टरमधुन ४५ कट्टे तुर खाली केली मात्र गुरुवारच्या रात्री सुमारे साडेनऊच्या सुमारास आणखी तब्बल ३०० कट्टे ट्रकमध्ये आणले, सोमवार पर्यंतर तुर आणण्यास बंदी असल्यावरही दादागिरी करुन तुर कर्मचार्‍यांना उतरविण्यास भाग पाडली.

बाजार समितीचे संचालक धनराज सिताराम चव्हाण यांच्या नावावर आधी ४५ कट्टे रजिस्टरवर नोंद होते. रात्रभरात त्यात तब्बल तीनशे अशी एकुण त्यांच्या नावावर ३४५ कट्टे तुर नोंदविण्यात आली. तर दुसरीकडे शेतकर्‍यांचा माल स्विकारला जात नाही.

त्यांना सोमवार पर्यंत थांबविण्यात येते तर दुसरीकडे मात्र व्यापार्‍यांच्या वेशात आलेले संचालकच गैर फायदा उचलत असतांना बाजार समितीचे या गंभीर प्रकाराकडे सध्या तरी अक्षम्य दुर्लक्ष दिसते. अशा घडलेल्या गंभीर प्रकाराने संताप अनावर होत आहे.

पारदर्शी कारभाराचे धडे देणारेच जर गैरकारभाराला उत्तेजन देतांना दिसतात . खर्‍या शेतकर्‍यांवर अन्याय होऊ नये, व्यापारी तत्वाचे पालन होऊ नये नाही तर शतकर्‍यांतर्फे या घटनेचा आगडोंब उसळेल असेही काही शेतकरी बोलु लागले आहे.

सकाळी आम्हाला विषय समजला संचालकानेच तुर आणली आहे. रातोरात दादागिरी, दबाव आणुन माल उतरविण्यात भाग पाडले. त्यामुळे आलेला माल मोजला जाणार नाही!

– तुकाराम निकम, सभापती, बाजारसमिती, जामनेर

शेतकी संघाकडे तुर मोजण्याचे कार्य आहे. आलेल्या तुरीच्या मालाला नंबर देण्याचे काम बाजार समिती करते आणि जर असा प्रकार असेल तर रात्रीच्या वेळेला आलेली सर्व ३०० कट्टे तुर मोजली जाणार नाही. आम्ही शेतकरी हितोच कार्य करु दादागिरी खपवुन घेणार नाही.

– चंद्रकांत बावीस्कर  सभापती शेतकरी संघ, जामनेर

LEAVE A REPLY

*