शेतकर्‍यांना कर्जमुक्ती मिळाल्याने शिरपूर भाजपाचा जल्लोष

0
शिरपूर । प्रतिनिधी-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांना निकषासह सरसकट कर्ज माफी देण्याचा सरकारने जाहिर केल्याने तसेच अल्पभूधारक शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतल्याने तसेच या कर्जमाफीमुळे अल्पभूधारक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाल्याने व लगेच या शेतकर्‍यांना नवे कर्ज मिळण्याचा मार्गही मोकळा करून दिल्याने येथील भारतीय जनता पार्टी तर्फे आतिषबाजी करून व शेतकर्‍यांना पेढे देवून जल्लोष साजरा करण्यात आला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकर्‍यांसाठी अतिशय क्रांतीकारी निर्णय घेतल्याने या निर्णयाचे स्वागत व जल्लोष शिरपूर येथील विजयस्तंभ चौकात भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा सरचिटणीस अरूण धोबी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हाचिटणीस संजय आसापूरे, जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष रमेश वसावे, अनु.जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष एन.डी.पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस दीपक ठाकूर, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, शहर उपाध्यक्ष रोहीत शेटे, राहूल देवरे, शहर चिटणीस राधेश्याम भोई, रहिम खाटीक, युवामोर्चा शहराध्यक्ष विक्की चैधरी, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हासरचिटणीस मुबीन शेख, जिल्हा चिटणीस जाकीर तेली, शहराध्यक्ष अरमान मिस्तरी, भटूू माळी, नितीन धनगर, सिताराम थोरात, राजु विसपूते, रवि सोनार, योगेश भोई, विशाल पाटील, रविंद्र भोई, नारायण धनगर आदींनी जल्लोष करून आनंद साजरा केला.

LEAVE A REPLY

*