शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय धाडसी-ना. रावल

0
दोंडाईचा । दि.6 । प्रतिनिधी-गेल्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात आघाडी सरकारने प्रत्येक कामात मोठा गैरव्यवहार केला. त्यामुळे राज्यावर कर्जाचा मोठा डोंगर उभा राहीला आहे.
70 हजार कोटी खर्च करून मागील सरकारने केवळ 0.1 टक्के सिंचन केले होते. पंरतू मुख्यमंत्री देवंेंंद्र फडणवीस यांनी डिसेंंबर 2014 मध्ये जलयुक्त शिवार योजनेची घोषणा केली.

या योजनेतून केवळ 4000 हजार कोटी खर्च करून 12 लाख हेक्टर जमिनीत सिंचन निर्मिती केली आहे. शेतकर्‍यांना आज कर्जमाफी दिली.

शेतीला पाणी, मुबलक वीज, आणि उत्पादीत केलेल्या मालाला योग्य दर यासाठी फडणवीस सरकार काम करीत असून आगामी काळात शेतकर्‍यांना सक्षम करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यावर आमचे सरकार काम करीत आहे, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री ना. जयकुमार रावल यांनी केले.

 

LEAVE A REPLY

*