Type to search

धुळे

शेतकर्‍यांना एकरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी

Share

धुळे । शेतकर्‍यांना एकरी 50 हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, शेतकर्‍यांना पुरेशी पिकविमा रक्कम देणे व  फसवूणक करणार्‍या विमा कंपन्यांवर कारवाई करावी, देशात दरमहा 10 लाख नोकर बाजारात प्रवेश करतात. त्यात सरकारांच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील करोडो रोजगार संधी संपुष्टात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक सुशिक्षित बेरोजगारास मासिक 5 हजार रुपये भत्ता व अशिक्षित बेरोजगारास मासिक 3 हजार रुपये बेकारभत्ता द्यावा, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीतर्फे करण्यात आली आहे. त्यासाठी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शन करण्यात आली.

याबाबत जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ पडून शेतीचे अमाप नुकसान होऊन बळीराजा देशोधडीला लागला आहे. त्यामुळे अशा शेतकर्‍यांना एकरी 50 हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, पिकविमा योजनेतंर्गत शेतकरी कंगाल व विमा कंपन्या मालामाल झाल्या असून सरकार व विमा कंपन्यांच्या साठगाठमुळे शेतकरी आणखीनच फसविला गेला आहे. शेतकर्‍यांना पुरेशी पिकविमा रक्कम देणे व फसवणूक करणार्‍या विमा कंपन्यांवर कारवाई करावी. राज्यातील प्रत्येक नागरिकास आरोग्य विम्याचे सुरक्षा कवच द्यावे, त्यासाठी सरकारने आगामी अर्थसंकल्पात तरतूद करावी.  केजी टु पीजी मोफत शिक्षण धोरणाचा पुरस्कार व उच्च शिक्षणासाठी शून्य टक्के व्याज दराने शक्षाणक कर्ज उपलब्ध करण्याचे राज्य सरकारने बँकांना निर्देश द्यावेत. नव्या उद्योगधंद्यात 80 टक्के नोकर्‍या या स्थानिक भूमिपूत्रांना देण्यासाठी नव्या सरकारने त्वरीत कायदा करावा.

राज्यातील प्रत्येक कामगारास किमान वेतन हे  21 हजार रूपये झालेच पाहिजे. राज्यातील  शासकीय कर्मचार्‍यांना पुन्हा जुनी पेंशन योजना लागू करावी. राज्यात आरक्षण कक्षेतील सर्व घटकांच्या हक्काची आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे. तसेच प्रत्येक घरात पात्रतेनुसार किमान एका पात्र उमेदवारास सरकारी नोकरी या धोरणाची अंमलबजावणी सरकारने केली पाहीजे. महाराष्ट्रातील ओबीसींची जनगणना ही झालीच पाहिजे व त्यांच्यासाठी स्वतंत्र मंत्रालय  निर्माण करावे. राज्यातील भटके-विमुक्त समाजाला क्रिमीलेअरची अट नष्ट करणे त्यांना एस.सी, एस.टी अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 चे रक्षण बहाल करणे व भटक्या विमुक्तांच्या तांड्यांना, वस्त्यांना महसूली गावाचा दर्जा द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी रविकांत वाघ, नरेश दामोदर, सुरेश झाल्टे, सिताराम वाघ, चंद्रमणी वाघ, सुभाष पाटील, मोहन शिरसाठ, दिलीप बोरसे, भूषण ब्राम्हणे, विनोद भामरे, इम्रान पठाण,  सईद शेख, समीर पठाण आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!