शेतकरी संपाला राष्ट्रवादीचे पाठबळ

0

प्रशासनाला बळीराजाची सनद; 2 लाख सह्यांचे निवेदन देणार 

 

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगरसह राज्यात सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या संपाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. 10 जूनला प्रत्येक तालुक्यांत राष्ट्रवादी पक्षाकडून तहसीलदारांना प्रत्येकी 10 हजार शेतकर्‍यांचे तर नगर शहरातून 50 हजार सह्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले जाणार आहे. यासोबतच बळी राजाची सनद देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले आणि माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी दिली.

 
शेतकरी संपाच्या पार्श्‍वभूमीवर घुले आणि कळमकर यांनी शुक्रवारी नगर येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने काढलेल्या संघर्ष यात्रनंतर शेतकर्‍यांमध्ये खर्‍या अर्थाने जागृती झाली आहे. यामुळे शेतकरी सरकारच्या फसव्या धोरणा विरोधात एकत्र आला आहे. राष्ट्रवादी पक्षाचा शेतकर्‍यांच्या संपाला पाठिंबा आहे.

 

 

राज्य सरकारने शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथ आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करण्यात याव्यात, शेतकर्‍यांना दिवसा पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध करून देण्यात यावी, 60 वर्षांपुढील शेतकर्‍यांना पेन्शन देण्यात यावी, शेतमालाच्या आधारभूत किंमतीच्या दीड पट्ट किंमत देऊन त्यांचा माल शासनाने खरेदी करावा या मागण्या बळीराजाची सनद या माध्यमातून सरकारकडे करण्यात येणार असल्याचे घुले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*