शेतकरी संघटनेतर्फे १४ ला राज्यव्यापी आंदोलन

0

नाशिकरोड | दि.२ प्रतिनिधी- केंद्र आणि राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी संघटनेच्या वतीने १४ मार्चला राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. भाजपाने निवडणुक जाहीरनाम्यात दिलेले एकही अश्‍वासन पुर्ण केले नाही त्याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले आहे. अशी माहिती प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाजपा सरकारने निवडणुक जाहीरनाम्यात कृषीविषयक धोरणात अमुलाग्र बदल करण्याचे अश्‍वासन दिले होते. उत्पन्न खर्च व त्यावर पन्नास टक्के नफा देण्याचे अश्‍वासन जाहीरनाम्यात होते असे असंख्य अश्‍वासने शेतकरयांना जाहीरनाम्यात दिलेली आहे. मात्र प्रत्यक्षात एकही अश्‍वासन पुर्ण केलेले नाही.

परिणामी शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. शेतकरयांच्या पिकाला भाव मिळत नाही त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारलेला आहे. परंतु तरीही केंद्र सरकारला याचे काहीही देणे घेणे नाही . निर्दयी शासनाचा निषेधनोंदविण्यासाठी १४ मार्च रोजी शेतकरी संघटनेचे जिल्हा पदाधिकारी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत.

या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. १ व २ मार्च रोजी नाशिकरोड येथील राज्य कार्यकारीणीची बैठक कुलथे मंगल कार्यलयात झाली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पदाधिकारी बोलत होते.

केंद्र शासनाने हरभरा, गहू, आणि तुरडाळ यांच्या आयात आणि निर्यातीचे धोरण बदलले त्यामुळे या पिकांचे भाव कोसळले आहेत.यामुळे शेतकरयांचा उत्पन्न खर्चही सुटणार नाही. त्याचप्रमाणे कच्ची साखर आयातीचे धोरण स्वीकारले त्यामुळे साखरेलाही भाव मिळणार नाही.

साखर कारखान्यांच्या अडचणीत चुकीच्याधोरणामुळे भर पडणार आहे. मोठया प्रमाणात काद्यांची आयात केली गेल्याने कांद्याला भाव मिळत नाही सर्वच बाजूने शेतकरी अडचणीत सापडला आहे. यामुळे देशात समारे साडेतीन लाख शेतकरयांनी आत्महत्या केल्या आहेत.

शासनाने शरद जोशी आक्स फोर्सचे अध्यक्ष असतांना तयार केलेल्या अहवालाची अंमलबजावणी करावी, याकरीता राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १४ मार्चला एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

या पत्रकार परिषदेसाठी माजी आमदार वामनरावचटप, माजी अध्यक्ष गुणवंत पाटील, महिला आघाडी अध्यक्षा मिराताई खांडे भराड, युवा आघाडी अध्यक्ष शैलेश दणी, माजी अध्यक्ष रामचंद्र पाटील, देविदास पवार, डॉ. अप्पासाहेब बदम , सिमा नरोडे, सुधीर बिंदू, अर्जुन रोबारे, शंकर पुरकर, रामकिसन बोंबले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*