शेतकरी प्रश्‍नी सोमवारी चक्काजाम

0

शेतकरी सुकाणू समितीच्या बैठकीत निर्णय

 

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती व शेतमालाला रास्त हमीभाव या दोन्ही प्रश्‍नावर सुकाणू समितीने जाहीर केलेल्या महाराष्ट्र चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी संघटना व समविचारी संघटनांची बैठक झाली असून त्यात श्रीरामपूर-नेवासा रोड, अशोकनगर फाट्यावर चक्काजाम करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यजाची माहिती शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे यांनी दिली.

 

 

1 जून पासून शेतकर्‍यांनी स्वयंस्फूर्तीने पुकारलेल्या ऐतिहासिक संपानंतरही सरकारने कुटील डाव खेळून कर्जमाफी मिळविण्यासाठी अनेक कुटील अटी, शर्ती व निकष, घोषणा व शासन निर्णय करुन शेतकर्‍यांची चेष्टा चालविली आहे. यामुळे शेतकर्‍यांमध्ये प्रचड गोधळ व असतोष निर्माण झाला आहे. शेती मालाचा रास्त हमी भावाचा मूळ प्रश्‍न बाजुलाच पडलेला आहे. सरकारने संपूर्ण कर्जमुक्ती व दिडपट हमीभावाचा निर्णय जाहीर केल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.

 

 

यावेळी सुकाणू समितीचे सदस्य बाळासाहेब पटारे, छावा संघटनेचे अ‍ॅड. सुभाष जंगले, अ‍ॅड. शिवाजी घोडे, कुरेशी समाज संघटनेचे महेबुबभाई कुरेशी, मराठा महासंघाचे दत्तात्रय कांदे, लाल निशाण पक्षाचे लक्ष्मण डांगे, विठ्ठल माळी, विलास कमम, शिवाजीराव कवडे, युवराज जगताप, अनिल औताडे, शरद आसने, बाळासाहेब कदम, विष्णू मोरे, संदीप उघडे, दगडू बडाख, आदि संघटनांची कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*