शेतकरी आंदोलनाचा विश्‍वासघात : सावंत

0

अकोले (प्रतिनिधी) – उच्चांक बिंदू गाठण्याची शक्यता निर्माण झालेल्या उत्स्फूर्त शेतकरी आंदोलनाचा अचानक अक्षम्य विश्वासघात झाला आहे. या मूठभर विश्वासघात करणार्‍या उपटसुंभांचा जाहीर निषेध करत शेतकरी चळवळीतील सर्व नेते व कार्यकर्त्यांनी शेतकर्‍यांच्या भवितव्यासाठी एकत्रित येऊन पुढील दिशा ठरवावी, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथराव सावंत यांनी केले.

 

 
पुणतांबा येथे सोडलेल्या या संकल्पाच्या अंमल बाजावणीची जून 2017 ला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा या संकल्पाच्या ठिणगीचा संपूर्ण महाराष्ट्रात एका रात्रीत प्रचंड वणवा तयार झाला. परंतु सरकार बरोबर चर्चा करण्यासाठी जाऊन संप मागे घेण्याचा जो निर्णय घेतल्याचे समजले ते ऐकून मन सुन्नच नव्हे तर उद्विग्न झाल्याचे सावंत यांनी सांगितले.

 

 

शेतकर्‍यांचे सैन्य अत्यंत उत्स्फूर्तपणे ज्या त्वेषाने अव्याहतपणे शोषण करणार्‍या सरकाररूपी राक्षसावर तुटून पडले असताना अचानकपणे ‘थांबा’ असा मोठा आवाज काढून हे लढणारे हात ढिले पाडण्याचे पाप या चर्चा करण्यासाठी गेलेल्यांनी केले आहे. याला अक्षम्य विश्वासघात याशिवाय दुसरा शब्द नाही, असे सावंत म्हणाले.

LEAVE A REPLY

*